ठक्कर बाप्पा वस्ती सुधार योजनेतील कामांची माहिती उपलब्ध


अलिबाग, जि. रायगड, दि.14 (जिमाका)-प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प पेण या प्रकल्पाच्या जिल्ह्यातील कार्यक्षेत्रामध्ये ठक्कर बाप्पा वस्ती सुधार योजने अंतर्गत सन 2018- मध्ये अनुसूचित जमातीच्या आदिवासी वाड्याकरिता विविध सुविधा उपलबध होण्याकरिता अंतर्गत रस्ता क्रॉक्रीटीकरण करणे, समाज मंदिर बांधणे, व्यायाम शाळा बांधणे, रस्ता तयार करणे, स्मशानभूमि बांधणे, स्मशानभूमिकडे जाणारे रस्ते तयार करणे, जोडरस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे, विहिर बांधणे, नळपाणी पुरवठा योजना, विहिर दुरुस्ती व खोलीकरण करणे, नदी काठी घाट बांधणे, इत्यादी कामांना मंजूरी प्रदान करण्यात आलेली आहे.  या मंजूर झालेल्या कामांचा दर्जा, मंजूर निधी, गुणवत्ता याबाबतची अनुसूचित जमातीच्या जनतेस व्हावी.   सदर यादी कार्यालयात पहावयास मिळेल, तसेच मंजूर कामाचा दर्जा व गुणवत्ता चांगल्या प्रकारे व्हावा यासासाठी लोकप्रतिनिधी व स्थानिक ग्रामस्थ यांनी सदर कामाबाबत लक्ष द्यावे.  या कामांबाबत काही शंका-कुशंका असल्यास अथवा तक्रारी असल्यास योजनेची संबंधित कार्यान्वित यंत्रणा यांचेकडे मांडू शकता असे आवाहन, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक