विशेष लेख: गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, बालके व किशोरवयीन मुलींनी घ्या योग्य आहार अन् राहा निरोगी..!


शासन महिला व बालकांच्या विकासासाठी सदैव तत्पर आहे. गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, बालके, किशोरवयीन मुली यांनी आपल्या दैनंदिन जीवनात योग्य आहार घेवून आपले आरोग्य निरोगी ठेवणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घेवू या या लेखाच्या माध्यमातून..!

1.    गरोदर स्त्रिया:-

·         दररोज आयरन आणि व्हिटॅमिनयुक्त विविध पौष्टिक आहार घ्यावा.

·         पौष्टिक असलेले दूध आणि तेल तसेच आयोडीनयुक्त मीठ खावे.

·         आई.एफ.ए. ची लाल गोळी चौथ्या महिन्यापासून ते 180 दिवसांपर्यंत दररोज खावी.

·         कॅल्शियमची ठराविक मात्रा घ्यावी.

·         नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी.

·         1 एल्बेण्डाजोलची गोळी दुसऱ्या तिमाहीत घ्यावी.

·         उंच जागी झाकून ठेवलेले शुद्ध पाणीच प्यावे.

·         डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर सोनोग्राफी करून घ्यावी.

·         प्रसूतीआधी कमीत कमी 4 ए.एन.सी तपासण्या ए.एन.एम. ताई किंवा डॉक्टरांकडून नक्की करून घ्यावी.

·         जवळचे रुग्णालय किंवा चिकित्सा केंद्रामध्येच आपली प्रसूती करवून घ्यावी.

·         स्वतः च्या स्वच्छतेची काळजी घ्यावी.

·         स्वयंपाकाआधी तसेच जेवणाआधी आपले हात साबणाने नक्की स्वच्छ धुवावेत.

·         नेहमी शौचालयाचा वापर करावा.

·         आहारामध्ये दूध, तूप, लोणी, अंडी, मासे, हिरव्या पालेभाज्या, विविध प्रकारच्या डाळी, कडधान्ये, फळे, शेंगदाणा-गूळ लाडू, राजगीरा लाडू इ. पोषण मूल्य अधिक असणाऱ्या अन्नपदार्थांचा समावेश करावा.

2. स्तनदा माता:-

·         दररोज आयर्न आणि व्हिटॅमिनयुक्त विविध पौष्टिक आहार घ्यावा.

·         पौष्टिक असलेले दूध आणि तेल तसेच आयोडीनयुक्त मीठ खावे.

·         बाळंत झाल्यापासून 06 महिन्यापर्यंत (180) दररोज आई.एफ.ए. ची एक लाल गोळी खावी.

·         कॅल्शिअयमची ठराविक मात्रा घ्यावी.

·         उंच जागी झाकून ठेवलेले शुद्ध पाणीच प्यावे.

·         तान्ह्या बालकाला जन्मानंतर एक तासाच्या आतच अंगावर पाजणे सुरू करावे आणि बालकाला आपले पहिले पिवळे घट्ट दूध पाजावे. आईचे पहिले पिवळे घट्ट दूध बालकासाठी पहिल्या लसीसारखे असते.

·         बालकाला सुरुवातीचे 06 महिने फक्त आपले दूधचं पाजावे आणि वरचे काहीही पाजू नये.

·         स्वत:च्या आणि आपल्या बालकाच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी.

·         स्वयंपाकाआधी तसेच जेवणा आधी आपले हात साबणाने नक्की स्वच्छ धुवावेत.

·         बालकाची शी साफ केल्यावर आणि तुम्ही शौच केल्यानंतर तुमचे हात साबणाने अवश्य धुवावेत.

·         बालकाच्या शी ची विल्हेवाट लावण्यासाठी आणि तुम्ही आपल्या शौचाकरिता नेहमी शौचालयाचा वापर करावा.

·         आहारामध्ये दूध, तूप, लोणी, अंडी, मासे, हिरव्या पालेभाज्या, विविध प्रकारच्या डाळी, कडधान्ये, फळे, शेंगदाणा-गूळ लाडू, राजगीरा लाडू इ. पोषण मूल्य अधिक असणाऱ्या अन्नपदार्थांचा समावेश करावा.

3. बालके:-

·         6 महिन्याचे झाल्यावर त्याला आईच्या दूधासोबत वरचा आहार देणे सुरू करावे.

·         दररोज आर्यन आणि व्हिटॅमिनयुक्त विविध प्रकारचे पौष्टिक आहार द्यावा.

·         कुस्करलेला आणि घट्ट असा वरचा पौष्टिक आहार द्यावा.

·         पौष्टिक केलेले दूध आणि तेल तसेच आयोडीनयुक्त मीठ खावे.

·         आई.एफ.ए. आणि व्हिटॅमिन ए ची ठराविक मात्रा द्यावी.

·         पोटातील जंतापासून बचाव करण्यासाठी 12 ते 24 महिन्याच्या बालकाला अर्धी गोळी, आणि 24 ते 59 महिन्याच्या बालकाला एक गोळी एलबेण्डाजोलची गोळी, वर्षातून दोन वेळा आंगणवाडी केंद्राच्या मदतीने द्यावी.

·         अंगणवाडी केंद्रावर बालकाला नियमितपणे घेवून जावे आणि त्याचे वजन अवश्य करावे.

·         बौध्दिक विकासाकरिता बालकाच्या वयानुसार पौष्टिक आहार अंगणवाडी केंद्राच्या कार्यकर्ती, आशा ए.एन.एम. किंवा डॉक्टर द्वारे सांगितलेल्या मात्रेत द्यावा.

·         5 वर्षापर्यंतच्या सूचीमध्ये नमूद केलेल्या सर्व लसी बाळाला नियमित टोचून घ्याव्यात.

·         स्वतःला स्वच्छतेची सवय लावून घ्यावी.

·         उंच जागी झाकून ठेवलेले शुद्ध पाणीच प्यावे.

·         जेवण घेण्यापूर्वी आणि जेवण भरविण्यापूर्वी अवश्य साबणाने हात स्वच्छ धुवावेत.

·         शौच केल्यानंतर तुमचे हात साबणाने स्वच्छ अवश्य धुवावेत. वयानुसार बालकाशी खेळावे आणि गप्पा माराव्यात.

·         बालकाच्या शी ची विल्हेवाट नेहमी शौचालयात लावावी.

·         बाळ जन्मल्यावर बाळाला तात्काळ स्तनपान सुरु करावे.

·         6 महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान दयावे, स्तनपानाव्यतिरिक्त बाळास कोणतेही अन्नपदार्थ देवू नयेत.

·         6 महिन्यानंतर बाळाला भाताची पेज, तांदळाची पेज इ. अन्नपदार्थ सुरू करावेत, स्तनपान कोणत्याही परिस्थितीत बंद करू नये.

·         बालक 2 वर्षाचे होईपर्यंत बाळाला स्तनपान देणे अत्यंत आवश्यक आहे.

·         आहारामध्ये दूध, तूप, लोणी, अंडी, मासे, हिरव्या पालेभाज्या, विविध प्रकारच्या डाळी, कडधान्ये, फळे, शेंगदाणा-गूळ लाडू, राजगीरा लाडू इ. पोषण मूल्य अधिक असणाऱ्या अन्नपदार्थांचा समावेश करावा.

 

4. किशोरवयीन मुली:-

·         किशोरवयीन मुलींना आर्यन आणि व्हिटॅमिनयुक्त विविध पौष्टिक आहार अवश्य खाऊ घालावा. जेणेकरून मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे आर्यनची (लोह) झालेली कमतरता भरून निघेल आणि त्यांचा संपूर्ण विकास होईल.

·         पौष्टिक केलेले दूध आणि तेल तसेच आयोडीनयुक्त मीठ खावे.

·         आई.एफ.ए. ची एक निळी गोळी आठवड्यातून एकदा नक्की घ्यावी.

·         स्वतःच्या स्वच्छतेची आणि मासिक पाळीच्या वेळी घ्यावयाच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी.

·         पोटातील जंतापासून बचाव करण्यासाठी वर्षातून दोन वेळा एक एल्बेण्डाजोलची गोळी घ्यावी.

·         उंच जागी झाकून ठेवलेले शुद्ध पाणीच प्यावे.

·         जेवणाआधी हात साबणाने नक्की धुवावेत.

·         शौचानंतर हात साबणाने नक्की धुवावेत.

·         नेहमी शौचालयाचा वापर करावा.

·         आहारामध्ये दूध, तूप, लोणी, अंडी, मासे, हिरव्या पालेभाज्या, विविध प्रकारच्या डाळी, कडधान्ये, फळे, शेंगदाणा-गूळ लाडू, राजगीरा लाडू इ. पोषण मूल्य अधिक असणाऱ्या अन्नपदार्थांचा समावेश करावा.

 

अशा प्रकारे पोषण अभियानांतर्गत जिल्हा अभिसरण समिती रायगड यांनी सुचविल्याप्रमाणे गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, बालके व किशोरवयीन मुली यांनी स्वत:च्या आहारावर विशेष लक्ष देवून आपल्या आरोग्याची नियमितपणे काळजी घ्यावी, असे आवाहन या लेखाद्वारे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री.विनीत म्हात्रे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालकल्याण), जिल्हा परिषद श्री.नितीन मंडलिक यांनी केले आहे.

 

    मनोज शिवाजी सानप

                                जिल्हा माहिती अधिकारी

रायगड-अलिबाग

 

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक