डिजिटल स्वदेस उपक्रमांतर्गत पोलीस पाटलांना अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले मार्गदर्शन


अलिबाग,दि.11(जिमाका):- रायगड जिल्हा पोलीस व स्वदेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल स्वदेस उपक्रमांतर्गत पोलीस पाटील यांचे हक्क व कर्तव्य या विषयावर झूम मीटिंगच्या माध्यमातून अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी जिल्ह्यातील पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले.

यावेळी स्वदेस फाउंडेशनचे उपसंचालक तुषार इनामदार सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी व जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.

पोलीस पाटलांचा क्षमता बांधणी हा कार्यक्रम वर्षभर सुरू राहणार असून त्यामध्ये शासकीय योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम व विविध विषयावर प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला पोलीस पाटलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक