डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमीत्त स्वाधार शिष्यवृत्ती वाटप, रक्तदान शिबीर, ज्येष्ठ नागरिक जनजागृती मेळावा, सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती पथनाट्याद्वारे प्रसिद्धी व महात्मा फुले जयंतीनिमीत्त व्याख्यान उत्साहात शुभारंभ

अलिबाग,दि.13 (जिमाका):- सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड-अलिबाग कार्यालयामार्फत डॉ.बाबासाहेब 131 व्या जयंतीनिमित्त दि.06 एप्रिल ते दि.16 एप्रिल 2022 दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुषंगाने शुक्रवार (दि.08 एप्रिल 2022) रोजी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात (अतिरिक्त जिल्हाधिकारी निवड श्रेणी) तथा अध्यक्ष, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रायगड-अलिबाग डॉ.भरत बास्तेवाड यांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार 6 लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरुपात रु.59 हजार 500 प्रत्येकी स्वाधार शिष्यवृत्तीचे धनादेश वाटप करण्यात आले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांच्या सहकार्याने दि.09 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, अलिबाग येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक अलिबाग शैलेश सणस यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी स्वत:रक्तदान केले. या शिबिराकरिता अंदाजे 70 व्यक्ती उपस्थित राहिल्या. त्यापैकी 30 व्यक्तींनी रक्तदान केले. तसेच जेष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबीर व नागरिकांचा मेळावा श्री समर्थ कृपा वृद्धाश्रम, परहूर, अलिबाग येथे जेष्ठ नागरिकांकरिता जनजागृती शिबीर घेण्यात आले. या कार्यक्रमास मोठया संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात जेष्ठ नागरिकांचा प्रवासाबाबत श्री समर्थ कृपा वृद्धाश्रमचे अध्यक्ष श्री.गुजाळ यांनी प्रास्ताविकात माहिती दिली. तर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव यांनी नागरिकांस मार्गदर्शन केले.

रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागात योजनांबाबत जनतेचे प्रबोधन करण्याकरिता दि.10 एप्रिल 2022 रोजी पथनाट्य व लघुनाटिका याद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनतेचे प्रबोधन करण्यात आले. या कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त कार्यालयातील कर्मचारी व प्रिझम ग्रुप, अलिबाग यांच्यामार्फत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या प्रसार व प्रचाराकरिता अलिबाग बसस्थानक, पोयनाड बसस्थानक, वडखळ बसस्थानक व पेण बसस्थानक येथे लघुनाटिकेचे व पथनाट्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या लघुनाटिका पथनाट्य कार्यक्रमास लोकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने दि.11 एप्रिल 2022 रोजी ना.ना.पाटील सभागृह, रायगड जिल्हा परिषद येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव यांनी केले. तर प्रमुख व्याख्याते म्हणून शाम जोगळेकर व प्रा.डॉ.पी.बी.आचार्य हे उपस्थित होते. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक कार्याविषयी उपस्थितांचे प्रबोधन केले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक