जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा तक्रारीबाबत धडक मोहीम राबविण्याकरिता सन 2022-23 साठी जिल्हास्तरीय भरारी पथकाची स्थापना

अलिबाग,दि.13 (जिमाका):- जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा तक्रारीबाबत धडक मोहीम राबविण्याकरिता रायगड जिल्ह्यात सन 2022-23 साठी जिल्हास्तरीय भरारी पथकाची स्थापना करण्यात येत आहे. या भरारी पथकामध्ये खालीलप्रमाणे अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पथक प्रमुख: रायगड जिल्हा परिषद, कृषी विकास अधिकारी श्री.लक्ष्मण खुरकूटे.

सदस्य: उपविभागीय कृषी अधिकारी, अलिबाग/माणगाव श्री.कैलास वानखेडे, उपविभागीय कृषी अधिकारी, खोपोली/महाड श्री.बालाजी ताटे, रायगड जिल्हा परिषद, मोहिम अधिकारी श्री.मिलींद चौधरी, निरिक्षक वैद्यमापनशास्त्र रायगड श्री.बी.आर.चव्हाण.

सदस्य सचिव: जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक श्री.गोरक्षनाथ मुरकूटे.

जिल्हास्तरावर नियुक्त केलेल्या भरारी पथकाने कृषी निविष्ठांच्या गुणवत्ता नियंत्रणाचे मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कार्यवाही करावी व त्याचा अहवाल वेळोवेळी या कार्यालयास सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले व रायगड जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी श्री.लक्ष्मण खुरकूटे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक