महाड दुर्घटना 19 मृतांच्या वारसांना मदत

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
   दिनांक :- 09 ऑगस्ट, 2016                                                                                      वृत्त क्र.503
महाड दुर्घटना
19 मृतांच्या वारसांना मदत




            अलिबाग दि.09 :- महाड दुर्घटनेत एकूण 26 मृतदेह आतापर्यंत हाती आले असून त्यापैकी 19 जणांची वारस कागदपत्रे छाननी पूर्ण झाली आहे. त्यांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या शासकीय मदतीचे प्रत्येकी 4 लाख रुपयांचे धनादेश संबंधित तालुक्याच्या तहसिलदार यांच्याकडे पाठविण्यात आले असून ते  संबंधितांच्या वारसांना देण्यात येत आहेत. उर्वरित 7 जणांच्या संदर्भातही कार्यवाही सुरु आहे. लवकरच ती पूर्ण होईल. अशी माहिती महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती सुषमा सातपुते यांनी दिली.
            या दुर्घटनेतील मृत स्नेहल व सुनिल बैकर, अविनाश बलेकर, यांच्या वारसांना रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी धनादेश देऊन त्यांचे सांत्वन केले अजय सिताराम गुरव यांच्या वारसांना राजापूर तहसिलदार सचिन भालेराव यांनी तर प्रशांत माने यांच्या वारसांस अंधेरीचे महसूल नायब तहसिदार श्री.हलाले तसेच श्रीमती भूमी भूषण पाटेकर यांच्या वारसांना वैभववाडी तहसिलदार संतोष जाधव यांनी धनादेश दिले.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक