महाड दुर्घटना महसूल मंत्र्यांनी दिला वारसाला मदतीचा धनादेश

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
Phone No. -222019
Fax-223522
Blog-dioraigad
 
             Email - dioraigad@gmail.com
             Twitter-@dioraigad
             Facebook-dioraigad
      दिनांक :- 11 ऑगस्ट, 2016                                                        वृत्त क्र.516
महाड दुर्घटना
महसूल मंत्र्यांनी दिला
वारसाला मदतीचा धनादेश


          अलिबाग दि.11 :- महाड सावित्री नदीवरील दुर्घटनेत  मृत झालेल्या एस.टी. वाहन चालक  मयत श्रीकांत शामराव कांबळे यांच्या पत्नी श्रीमती कमल कांबळे यांना आज  महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हातकणंगले तालुक्यात मौजे सावर्डे या गावी जावून शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या मदतीचे प्रत्येकी 4-4 लाख रुपयांचे  धनादेश देऊन सांत्वन केले. या दुर्देवी दुर्घटनेत श्रीकांत कांबळे यांच्या सोबत त्यांचा मुलगा महेंद्र हा देखील मृत पावला असल्याने एकूण 8 लाख रुपयांचे धनादेश देण्यात आला. 
          या दुर्घटनेतील 21 मृत व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपये  मदतीचा धनादेश देण्यात आला असून उर्वरित 5 जणांच्या संदर्भातही वारसाबाबत कार्यवाही सुरु आहे. लवकरच ती पूर्ण होऊन त्यांच्या वारसांना तातडीने धनादेश दिले जातील  अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सतिश बागल  यांनी दिली.
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक