भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे

 


 

 अलिबाग, दि.08 (जिमाका):- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त शासनाने दि.06 एप्रिल ते दि. 14 एप्रिल 2022 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम संपूर्ण राज्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांबाबत जनजागृतीसाठी जिल्हास्तरावर बहुविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

यानुसार अनु.जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान या वर्गात शिकत असलेल्या व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छित विद्यार्थी व त्यांच्या पालक यांच्याकरिता जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्याकामी अर्ज सादर करताना घ्यावयाची दक्षता व अर्ज सादर करताना येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना (जात प्रमाणपत्राची पडताळणी) याविषयी जनजागृतीसाठी मंगळवार, दि.12 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11.00 वा.सेमिनार, हॉल, जे.एस.एम.महाविद्यालय, अलिबाग येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.   

तरी च्छूक सर्व नागरिकांनी या कार्यशाळेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रायगड डॉ.भरत बास्टेवाड यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक