महाराष्ट्र विधीमंडळाच्या वतीने विधानसभा व विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी संसदीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमाचे आयोजन

 पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे व आमदार निरंजन डावखरे यांचाही सहभाग

 

अलिबाग, दि.05 (जिमाका):- महाराष्ट्र विधीमंडळाच्यावतीने विधानसभा व विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी लोकसभा सचिवालय आणि प्राईड संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 05 आणि 06 एप्रिल 2022 रोजी संसदीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या वतीने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, संसदीय कार्य मंत्री ॲड.अनिल परब, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार अनिकेत तटकरे तसेच सभागृहातील इतर ज्येष्ठ सदस्य या प्रशिक्षणास उपस्थित आहेत.

या कार्यक्रमांतर्गत राज्यातील नवनिर्वाचित आमदारांसह एकूण 110 आमदारांनी नोंदणी केली आहे. उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम व्यंकैय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला तसेच महाराष्ट्र विधीमंडळाचे पिठासीन अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये लोकसभा व राज्यसभा सदस्यांची व्याख्याने, शिबिरे, चर्चासत्रे असे लोकप्रतिनिधीभिमुख कार्यक्रम होणार आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक