विशेष लेख: महिला व बालकांच्या विकासासाठी शासन सदैव सज्ज..!

शासन महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध माध्यमातून प्रयत्नशील असते. यासाठी शासनाचा महिला व बालविकास विभाग हा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. या विभागामार्फत महिला व बालकांसाठी निरनिराळ्या योजना राबविण्यात येतात. काही महत्वाच्या योजना समजून घेवू या लेखाद्वारे..!

 

माझी कन्या भाग्यश्री योजना

लाभाचे स्वरुप:-

  • एक मुलगी असल्यास 50 हजार रु. दोन मुली असल्यास 25 हजार मुदत ठेव.
  • मुलगी 6 वर्षाची, 12 वर्षाची झाल्यास ठेवी रक्कमे वरील व्याज मिळेल व 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मुद्दल व व्याज मिळेल.
  • लाभार्थी मुलगी व तिची आई यांचेसंयुक्त बचत खाते राष्ट्रीयकृत बँकेत (बँक ऑफ महाराष्ट्र) उघडून दोघींना 1 लाख अपघात विमा, 5 हजार ओव्हरड्राफ्ट व इतर लाभ घेता येतील.
  • अंतिम लाभ घेताना मुलीचे वयाची 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे व अविवाहीत असणे असवश्यक.

पात्रता:-

  • दि.01 ऑगस्ट 2017 रोजी किवा त्यानंतर जन्माला आलेल्या मुली
  • कुटुंबात एक किवा दोन मुली अपत्य असल्यास योजनेचा लाभ घेता येईल.
  • तिसरे अपत्य असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असणे आवश्यक
  • 7.5 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणारे योजनेस पात्र
  • दुसऱ्या प्रसुतीचे वेळी जुळया मुली जन्मल्यास दोन्ही मुली लाभास पात्र
  • माता किंवा पिता यापैकी एकाने एका मुलीच्या जन्मानंतर 2 वर्षाच्या आत व दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
  • विधवा मातेने पतीच्या मृत्युचा दाखला अर्जा सोबत देणे आवश्यक आहे.
  • बालगृह/शिशुगृह किंवा बालविकास विभागांतर्गतच्या इतर निवासी संस्थान मधील अनाथ मुली संबंधितबालकल्याण समितीकडील "मुलगी अनाथ असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास लाभास पात्र राहिल.

आवश्यक कागदपत्रे (छायांकित प्रत):-

  1. शासन निर्णयानुसार विहित नमुन्यातील अर्ज
  2. लाभार्थी बालिकेचा जन्मदाखला
  3. माता किंवा पिता यापैकी एकाचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
  4. उत्पन्नाचा (तहसीलदारांचा) दाखला, रेशन कार्ड
  5. वडिलांचा रहिवासी दाखला, आधार कार्ड, आईचे आधार कार्ड, मुलीचे आधार कार्ड
  6. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत संयुक्त खाते पासबुक
  7. अपत्याचा दाखला (ग्रामपंचायत/नगरपरिषद/महानगरपालिका)

 

सुकन्या समृद्धी योजना

पात्रता:- 0 ते 10 वयोगटातील कमाल दोन मुली

  (प्रत्येक वर्षाला कमीत कमी रू.250 जमा करणे आवश्यक)
लाभ:- 8.5 % व्याज, शिक्षणासाठी 50% रक्कम, 21 वर्षे पूर्ण झाल्यावर पूर्ण रक्कम

संपर्क / विभाग:- पोस्ट ऑफिस, राष्ट्रीयकृत बँक

 

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

पात्रता:- सर्व गरोदर व स्तनदा मातांना पहिल्या अपत्यासाठी रूपये 5 हजारचा लाभ

लाभ:-

·         1 ला लाभ- रू.1 हजार:- गरोदरपणाची नोंद शासकीय आरोग्य संस्थेतील ए.एन.एम. यांच्याकडे मासिकपाळी चुकल्यानंतर 100 दिवसांच्या आत केलेली असल्यास.

·         2 रा लाभ- रू.2 हजार:- गरोदरपणाच्या 6 महिन्यात (180 दिवस) किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी केलेली असल्यास.

·         3 रा लाभ- रु.2 हजार:- प्रसूतीनंतर बाळाच्या जन्माची नोंद व बाळाचे 14 आठवड्यापर्यंतचे लसीकरण पूर्ण केलेले असल्यास.

संपर्क / विभाग:- आशा स्वयंसेविका / अंगणवाडी सेविका / आरोग्य सेविका / आरोग्य उपकेंद्र / प्राथमिक  

                          आरोग्य केंद्र/ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा.

 

अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना

पात्रता:- इयत्ता 5 वी ते 12 वीत शिकणाऱ्या मुली

लाभ:- घर ते शाळा/कॉलेज मोफत एस.टी. पास

संपर्क / विभाग:- नजीकचा एस.टी. डेपो

महिला व बालविकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या या योजनांचा इच्छूक व पात्र लाभार्थ्यांनी जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन या लेखाद्वारे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री.विनीत म्हात्रे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालकल्याण), जिल्हा परिषद श्री.नितीन मंडलिक यांनी केले आहे.

 

मनोज शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी

रायगड-अलिबाग

 

00000

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक