सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची त्रैमासिक सांख्यिकी माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी

 


 

अलिबाग, दि.08 (जिमाका):-रायगड जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालये‍ (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणे कायदा, 1959 व नियम 1960 च्या कलम 5 (1) अन्वये सार्वजनिक क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापना तसेच कलम 5 (2) अन्वये खाजगी क्षेत्रांतील कायद्यांतर्गत असणाऱ्या सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष, स्त्री व एकूण सांख्यिकी माहिती, प्रत्येक तिमाहीस‍, विषयांकित कायद्यातील तरतूदींनुसार ‍विहित नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.

त्यानुसार मार्च 2022 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड- अलिबाग या कार्यालयाकडून सुरु  असून, या सर्व आस्थापनांकडून शंभर टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. यासाठी सर्व आस्थापनांनी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर Employment या टॅबवरील Employer (List a Job) याला क्लीक करुन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरुन लॉगईन करावे व वेबपोर्टलवरील ER-1- Enter ER-1 याद्वारेú Employment Returns- (ER-1) याप्रपत्रात ईआर-1 बाबतची आपल्याकडील अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी.

हे तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल  2022 आहे, याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी  व हे तिमाही विवरणपत्र विहित मुदतीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावे.  त्याचप्रमाणे प्रत्येक आस्थापनेने आपल्या आस्थापनेचा नोंदणी तपशील (Employer Profile) देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्यावत करावा, या संदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य अथवा युजर आयडी/पासवर्ड याबाबत माहिती आवश्यक असल्यास या कार्यालयाचा ई-मेल आयडी alibagrojgar@gmail.com किंवा asstdiremp.raigad@ese.maharashtra.gov.in यावर आपला उद्योजक नोंदणी क्रमांक (युजरआयडी) व इतर सर्व आवश्यक तपशिलासह संपर्क साधल्यास आपणास या कार्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त शा.गि.पवार यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक