अलिबाग आगारातील वाहन चालक व वाहक यांचा प्रामाणिकपणा प्रवाशाचे विसरलेले 35 हजार रुपये केले परत

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.16 (जिमाका):-अलिबाग आगारातील बसचालक व वाहक यांनी बसमधील प्रवाशाची विसरलेली बॅग व त्याचे पैसे प्रामाणिकपणे परत करून एक आदर्श निर्माण केला आहे.

     दि.15 जून 2021 रोजी सकाळी 08:15 वाजता रेवदंडा व 09:15 वाजता अलिबागहून जाणाऱ्या रेवदंडा-बोरिवली गाडी क्र.3234 मधील एक प्रवासी त्याची बॅग विसरला  होता. बसचालक निलेश पाटील व वाहक जितेंद्र पवार यांनी या प्रवाशाची विसरलेली बॅग व बॅगमधील रोख रु. 35 हजार, ओळख पटवून त्यास परत केली.

    त्यांच्या या प्रामाणिक कृत्यामुळे अलिबाग आगाराची व एस.टी महामंडळाची प्रतिमा जनमानसात उज्ज्वल केल्याबद्दल या दोन्ही प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा  आगार व्यवस्थापक श्री.अजय वनारसे यांच्या हस्ते आज अलिबाग आगारात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक