परदेश शिष्यवृत्ती योजनेकरिता अर्ज करण्यासाठी दि.18 जून पर्यंत मुदतवाढ

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.10 (जिमाका):- अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाच्या (पी.एच.डी) अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेंतर्गत सन 2021-22 शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांकडून परदेशी शिष्यवृत्ती अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 जून 2021 पर्यंत होती. यात मुदतवाढ करण्यात आली असून आता दि. 18 जून 2021 पर्यंत या योजनेत विद्यार्थ्यांनी सहभागी होता येईल,

असे आवाहन समाजकल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.

       सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात अध्ययनासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.  पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी जागतिक स्तरावर तीनशेच्या आतील रँकमधील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे.  विद्यार्थ्यांनी नमुन्यातील अर्ज swfs.applications.२१२२@gmail.com  या ईमेलवर पाठवून त्याची प्रत मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह समाज कल्याण आयुक्तालय, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- 411001 या पत्त्यावर द्यावी.

       या योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शिक्षण संस्थेचे शिक्षण शुल्क, निर्वाहभत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहे. एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे आणि पी.एच.डी.साठी 40 वर्षे कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील एम.डी. आणि एम.एस. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र असतील. तसेच वार्षिक उत्पन्न सहा लाखापेक्षा जास्त नसावे.

     अर्जाचा सविस्तर नमुना व अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर रोजगार या लिंकवर भेट द्यावी, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त (पुणे) डॉ. प्रशांत नारनवरे (भाप्रसे) यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक