पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते भूमी अभिलेख कार्यालयांना ई. टी.एस.मशीनचे वितरण आमदार भरतशेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती

 


 

अलिबाग,जि.रायगड, दि.19 (जिमाका):- पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते व आमदार श्री.भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत आज (दि.19) रोजी  ई.टी.एस.मशीनचा वितरण सोहळा मध्यवर्ती प्रशासकीय भवन, माणगाव येथे संपन्न झाला.   

            यावेळी करोना काळात उत्तम सेवा दिलेल्या डॉक्टरांना "करोना योद्धा" म्हणून गौरविण्यात आले. समानार्थी डॉक्टर्स एकूण 40 होते, मात्र प्रातिनिधिक स्वरूपात डॉ.गौतम राऊत, डॉ.अजय मेहता, डॉ. आबासाहेब पाटणकर, डॉ.संजय माळी, डॉ. जगदीश बेडेकर, डॉ.आशिष जाधव, डॉ. अमित मेहता, डॉ.अभिजित पाटसकर या डॉक्टर्सना सन्मानपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

             यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्यासह महाड पोलादपूर विधानसभा आमदार श्री.भरत गोगावले, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रायगड श्रीमती चारुशीला चव्हाण, माणगाव प्रांताधिकारी प्रशाली जाधव - दिघावकर, तहसिलदार प्रियांका आयरे, पोलीस निरीक्षक श्री.अश्वनाथ खेडकर, श्री. सुभाष केकाणे, श्रीमती संगीत बक्कम, सर्व नगरसेवक, रायगड जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

             जिल्ह्यातील  तालुक्याच्या भूमी अभिलेख कार्यालयासाठी या ई.टी.एस. मशीनचे वितरण यावेळी करण्यात आले. या मशीनमुळे जागा मोजणीचे काम अत्यंत कमी वेळेत व अचूकपणे करता येणार असून नागरिकांची होणारी गैरसोय दूर होईल. संपूर्ण राज्यात रायगड जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाचे कामकाज प्रथम क्रमांकावर आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्रीमती चारुशीला चव्हाण यांनी दिली.  

            जिल्ह्यातील 9 तालुक्यातील अलिबाग - प्रदीप जगताप, पेण -सुधीर जाधव, पनवेल- विजय भालेराव, उरण- गणेश राठोड, कर्जत- इंद्रसेन लांडे, सुधागड- काशिनाथ मोरे, माणगाव- नरेंद्र आंबरे, मुरुड- योगेश कातडे, पोलादपूर- पंढरीनाथ चौधरी या भूमी अभिलेख उपअधीक्षक अधिकाऱ्यांकडे हे ई.टी.एस मशीन सुपूर्द करण्यात आले.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक