भूसंपादन अधिसुचनेबाबत हरकती मागवल्या


            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21-  माणगांव तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्ग क्र.66(जुना-17) च्या चौपदरीकरणासाठी मौजे इंदापूर ते वडपाले या 84 कि.मी . ते 108.430 कि.मी. या दरम्यानची मौजे कशेणे, विघवली, तिलोरे, कळमजे, नाणोरे, जावळी, गारळ, तळेगांव त.गोरेगांव, रेपोली, उसरघर, लोणेरे या गावांच्या भूसंपादन क्षेत्राची राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 (1956 चा 48) मधील कलम 3A ची अधिसूचना 17 नोव्हेंबर रोजी भारत सरकारच्या राजपत्रामध्ये (असाधारण, भाग-II, खंड-3 उपखंड(ii)) प्रसिध्द झाली असून सदरची अधिसूचना 15 डिसेंबर रोजी स्थानिक वर्तमान पत्र दै.रामप्रहर व दै.रत्नागिरी टाईम्स मध्ये प्रसिध्द झाली आहे. अधिसूचनेमधील जमीनी संबंधी कोणत्याही हितसंबंधीत व्यक्तींची तक्रार/हरकत असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आपले अर्ज उप विभागीय अधिकारी, माणगांव विभाग माणगांव यांच्याकडे अधिसूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून 21 दिवसांत सादर करावेत, असे उपविभागीय अधिकारी माणगांव विभाग, माणगांव यांनी कळविले आहे.
0000



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक