राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त गुरुवारी कार्यक्रम


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विद्यामाने गुरुवार दि.28 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात  राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच रायगड-अलिबागचे सदस्य श्रीकांत कुंभार  हे असून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अन्न व औषध प्रशासन रायगड आणि वैद्यमापन शास्त्र रायगड या विभागातील वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. तरी सर्वांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रम उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी एल.एम.दुफारे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक