माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवांसाठी माहिती पाठविण्याचे आवाहन



अलिबाग,(जिमाका)दि.22:-  केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली व सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग, या कार्यालयास रायगड जिल्हयातील माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवांची माहीती त्वरीत मागविली असून ती पुढीलप्रमाणे आहे.आधार कार्ड नंबर.,ई-मेल आडी.,मोबाईल नंबर.,बँक ऑकाउन्टं नंबर.,बँकेचे व शाखेचे नाव.,आय. एफ. एस. सी कोड नंबर.
तरी  जिल्हयातील माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवांनी आपली माहिती माजी सैनिक विश्रामगृह, महाड, माणगांव, पोलादपूर व विश्रामगृह, शासकीय विश्रामगृह, पनवेल (बुधवार - कल्याण संघटक दौरा) येथे जमा करावी.असे आवाहन मेजर प्रांजल. पी जाधव (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक