नारीशक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

नारीशक्ती पुरस्कारासाठी
प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
अलिबाग,(जिमाका)दि.21:-   महिला व बालविकास विभागामार्फत सामाजिक क्षेत्रात ज्या महिलांनी मौलिक कार्य केले आहे अशा महिलांच्या सन्मानार्थ 8 मार्च या जागतिक महिला दिनी नारीशक्त्ती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  या पुरस्काराचे स्वरुप रु.एक लाख व सन्मानचिन्ह असे आहे.
विधवा,परितक्त्या,निराधार,अपंग महिलांचे पुनर्वसन करणे अशा कार्यात ज्या महिलांनी तसेच शैक्षणिक प्रशिक्षण कार्य,पर्यावरण क्षेत्र,महिला स्वावलंबन या क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी मौलिक कार्य केले आहे आणि शेती व्यवसायात काबाडकष्ट करणाऱ्या महिलांचे विविध तांत्रिक यंत्राद्वारे ज्या महिलांनी श्रम कमी करण्यासाठी  जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत.  तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांनी अधिक सहभाग घ्यावा यासाठी ज्या महिलांनी प्रयत्न केले आहेत अशा महिलांना केंद्र शासनामार्फत पुरस्कार देण्यात येतात.
यासाठी सदरचे प्रस्ताव हे इंग्रजीमध्ये सादर करावेत.  अधिक माहितीसाठी माहितीसाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागांच्या www.wed.in   या संकेतस्थळावर भेट द्यावी.   तसेच  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग. पत्ता- श्रीबाग नं.02,वाजे हॉस्पीटल जवळ,ता.अलिबाग, जिल्हा रायगड (दूरध्वनी क्रमांक 02141-225321) ई-मेल: wedora@gmail.com  येथे संपर्क साधवा.
000000
           


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक