जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती नुकसानीचा दि.07 जुलै पर्यंतचा प्राथमिक अहवाल जाहीर

 

अलिबाग, दि.08 (जिमाका):- जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दि.07 जुलै 2022 रोजी सायंकाळी 6.00 पर्यंतचा जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती नुकसानीचा जाहीर करण्यात आलेला प्राथमिक अहवाल याप्रमाणे-

रायगड जिल्ह्यात दि.07 जुलै 2022 रोजी 125.45 मि.मी.सरासरी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस रोहा येथे 197 मिलिमीटर झाला आहे.

 दि.07 जुलै 2022 रोजी सायंकाळी 6.00 च्या अहवालानुसार सर्व नद्यांची पातळी इशारा पातळीपेक्षा कमी आहे.

रस्ते, रेल्वे वाहतूक:- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे जुना पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला.

अतिधोकादायक/धोकादायक इमारती धरणांबाबत:

तळा तालुक्यातील वावा लघुपाटबंधारे योजना ही पूर्ण क्षमतेने भरली आहे.

मुरूड तालुक्यातील अंबोली धरणात पूर्ण संचय पातळीपर्यंत साठा होवून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग होवू लागला आहे.

नदी पातळी:- सावित्री नदी, धोका पातळी- 6.50 मी., सध्याची पातळी-4.60 मी., कुंडलिका नदी, धोका पातळी-23.95 मी., सध्याची पातळी--23.50 मी., अंबा नदी, धोका पातळी-9.00 मी., सध्याची पातळी-7.70 मी., उल्हास नदी, धोका पातळी-48.77 मी., सध्याची पातळी-45.80 मी., गाढी नदी, धोका पातळी-6.55 मी., सध्याची पातळी-3.60 मी., पाताळगंगा नदी, धोका पातळी-21.52 मी., सध्याची पातळी-19.80 मी.,

दरड प्रवण, पूरप्रवण गावांमधून स्थलांतरित केलेल्या कुटुंबांची व नागरिकांची संख्या:- कुटुंब संख्या, 618, व्यक्तींची संख्या 1 हजार 911

1. ता.पोलादपूर मौजे चोळई, केवनाळे, धामणिचीवाडी धामण, आंबेमाची केवनाळे, ढवळे वडघर बु.लहुळसे, मोरसोड, खोपड, साबर, कोतवाल बु ओंबळी, धामणदिवी, कोंडवी, कामथे, चांदके, कातळी कामतवाडी, यंलगेवाडी भोगाव, तुळई (198 कुटुंबांतील 530 व्यक्ती)

2. ता.महाड मौजे बावले येथे (45 कुटुंब 76 व्यक्ती), मौजे दासगाव, दाभोळ, तळोशी, मोहोत-भिसेवाडी, भिवघर, वाघेरी आदिवासीवाडी, कसबेशिवथर आंबेनली, कोंडिवते, गोठे बु., महाड भिमनगर, दादली झोपडपट्टी, चांदवे खुर्द, कुंभे शिवधर, कोंडीवते येथील (228 कुटुंब 811 व्यक्ती),

3. ता.माणगाव इंदापूर येथील साईनगर मधील (2 कुटुंब 7 व्यक्ती) घरात पाणी शिरल्यामुळे स्थलांतरीत करण्यात आले आहे.

4. ता.पनवेल मधील मौजे आपटे येथे पाताळगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने मौजे परगाव डुंगी येथील सिडको पॉन्ड येथे पाणी भरले असून डुंगी, रुद्रनगर व पारगाव मधील (5 कुटुंब 15 व्यक्ती), करंजाडे-(3 कुटुंब 12 व्यक्ती) स्थलांतर केले आहेत.

5. ता.पेण चांदपट्टी दरडप्रवण गावामधील (26 कुटुंब 55 व्यक्ती) बेलवडे बु. (1 कुटुंब 4 व्यक्ती) स्थलांतरीत केले आहेत.

6. ता.मुरुड मौजे राजपूरी येथील (14 कुटुंब 65 व्यक्ती), मौजे मिठेखार 04 कुटुंबातील 23 व्यक्ती स्वमर्जीने नातेवाईकांकडे स्थलांतरीत झाले आहेत.

7. ता.अलिबाग मौजे सोगाव, (18 कुंटुब 33 व्यक्ती,) वेलवटवाटी (22 कुटुंब, 98 व्यक्ती), खानाव- 01कुटुंब 4 व्यक्ती) स्थलांतरीत करण्यात आले आहेत.

8. ता.श्रीवर्धन मौजे हरवी आदीवासीवाडी, कुडगाव (51 कुटुंब 184 व्यक्ती)

स्थलांतरण/मदत केंद्राची/गावांची संख्या:- कॅम्प संख्या- 34, कुटुंब संख्या- 554, व्यक्तींची संख्या- 1 हजार 739, महाड- 15 गावे, पोलादपूर 12 गावे, पेण-1, मुरुड 2, अलिबाग- 2, श्रीवर्धन- 2,

जीवितहानी- निरंक,

पूर्णत पडलेली घरे-

पक्की घरे- ता.मुरूड- 1 (सुरई आदिवासी वाडी), ता.अलिबाग- 1 (खानाव), ता.पेण- 1 (मुंगोशी प्रधानवाडी)

कच्ची घरे- 02, ता.पोलादपूर- 1 (वडविहीर- चिंचखांबाला), ता.खालापूर- 1 (चोपडा)

अंशत: पडलेली घरे:-

पक्की घरे-10- 1.ता.पेण 1 (खरवली), 2.ता.महाड 1 (घावरेकोंड), 3.ता.तळा- 1, 4.ता.अलिबाग- 03 (किहीम-आदिवासीवाडी, कावाडे), 5.ता.रोहा - 02 (महाळुंगे, किल्ला), 6.ता.सुधागड- 01 (महागाव-देऊळवाडी), 7.ता.श्रीवर्धन-01 (गालसुरे (दुकान)

कच्ची घरे-34, 1.ता.अलिबाग - 4 (फणसापूर, धाकटेशहापूर-1, अवेटी, चौल), 2.ता.तळा- 01 (चराईखुर्द), 3.ता.म्हसळा- 4 (आंबेत, म्हसळा, संदेरी, आदिवासीवाडी-म्हसळा), 4.ता.रोहा: 2 (तळाघर, चांदगाव), 5.ता.माणगाव- 5 (कावीळवहाळ बु. उड्रेवाडी, काकल, बामणोली, पेण तर्फे तले, वडवली), 6.ता.पनवेल- 03 (चोंचीदे, टेंभोडे, वाजे), 7.ता.पोलादपूर - 01 (पोलादपूर), 8.ता.श्रीवर्धन - 02 (गालसुरे, कुणबीवाडी) 9.ता.खालापूर- 06 (चोपडा, घोडीवली, महड, तळेगाव, वासंबे), 10.ता.कर्जत-04 (आंबेवाडी मांडवणे, सालोख तर्फे निड, वासरे), 11.ता.महाड-02 (टेंभी, वरंध आदिवासीवाडी), 12.ता.पाली-01 (महागाव देऊळवाडी)

पडझड झालेल्या झोपड्यांची संख्या- 5, ता.पनवेल (मालडुंगे- 1, सवणे- 1, करंजाडे- 3)

बाधित गोठ्यांची संख्या-

पूर्णत:- 2, 1.ता.माणगाव 01 (रिले), 2. ता.कळद 01 (कळद)

अंशत:- 8, 1. ता.पेण-04 (रोडे, करंबेली, वरसई पाडा), 2. ता.माणगाव-01(पणे/तळे), 3.ता.रोहा- 02 (पाली तर्फे अष्टमी, वावेखार), 4.ता.श्रीवर्धन-01 (नागलोली)

जीवितहानी व जखमी व्यक्ती अहवाल- निरंक.

पशुधन हानी:-

मोठे जनावर-1, माणगाव तालुक्यातील करंबेळी धनगरवाडी येथे 1 म्हैस पावसामुळे मृत्यूमुखी पडली आहे.

लहान जनावर- 7 (मुंगेशी 7 बकऱ्या जखमी), कोंबड्या पक्षी/पोट्री अहवाल-निरंक. 

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान:- 1.ता.म्हसळा-01 (आरोग्य केंद्र इमारत), 2.ता.पेण 01 (लाईट पोल एस.टी. स्टँड बाजूला), 3.ता.पनवेल 01 (नाव्हा बस स्टॉप), 4.ता.अलिबाग 01 (राजमळा बारक्या पुलावरील संरक्षक कठडा), 5.ता.रोहा 01 (जिल्हा परिषद शाळा मुक्ते पडवी पडली आहे), 6.ता.श्रीवर्धन-01 (दिघी मराठी शाळा विजेचा पोल).

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक