25 जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 284 पंचायत समित्यांचा आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर

 

अलिबाग, दि.08 (जिमाका):- मा.राज्य निवडणूक आयोगाचे दि.05 जुलै 2022 च्या आदेशान्वये 25 जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 284 पंचायत समित्यांचा आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला असून तो पुढीलप्रमाणे आहे.

अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षण सोडतीची सूचना परिशिष्ट मधील नमुन्यात वृत्तपत्र प्रसिद्ध करणे, कार्यवाही कोणी करावयाची आहे- जिल्हाधिकारी, टप्पा सुरू करण्याचा/ संपविण्याचा-दि.07 जुलै 2022.

 अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडत काढणे- जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी, कार्यवाही कोणी करावयाची आहे- जिल्हाधिकारी, पंचायत समिती निर्वाचक गणासाठी, कार्यवाही कोणी करावयाची आहे-तहसिलदार, टप्पा सुरू करण्याचा/ संपविण्याचा दिनांक- दि.13 जुलै 20122.

 सोडतीनंतर निवडणूक विभाग/निर्वाचक गणनिहाय आरक्षणाची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणे, कार्यवाही कोणी करावयाची आहे- जिल्हाधिकारी, टप्पा सुरू करण्याचा/ संपविण्याचा दिनांक- दि.15 जुलै 2022.

 निवडणूक विभाग/निर्वाचक गणनिहाय आरक्षण निश्चितीबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15 जुलै ते दि.21 जुलै 2022.

 आरक्षण सोडतीचा अहवाल तसेच सोडतीवर प्राप्त झालेल्या हरकती व सूचना अभिप्रायासह राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणे, कार्यवाही कोणी करावयाची आहे-जिल्हाधिकारी, टप्पा सुरू करण्याचा/ संपविण्याचा दिनांक- दि.25 जुलै 2022.

 प्रारूप आरक्षण अधिसूचनेवर प्राप्त हरकती व सूचनांवरील जिल्हाधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेऊन निवडणूक विभाग/निर्वाचक गणाचे आरक्षणास मान्य मान्यता देणे, कार्यवाही कोणी करावयाची आहे-राज्य निवडणूक आयोग, टप्पा सुरू करण्याचा/ संपविण्याचा दिनांक- दि.29 जुलै 2022 पर्यंत.

 मा.राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या निवडणूक विभाग/निर्वाचक गणाचे अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे, कार्यवाही कोणी करावयाची आहे-जिल्हाधिकारी, टप्पा सुरू करण्याचा/ संपविण्याचा दिनांक- दि.02 ऑगस्ट 2022.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड