आपत्ती व्यवस्थापनांतर्गत ॲम्ब्युलन्स स्टेशन सुरु करण्याचा जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचा अभिनव उपक्रम

 

उपजिल्हा रुग्णालय माणगाव, कर्जत व ग्रामीण रुग्णालय महाड, पोलादपूर येथे ॲम्ब्युलन्स स्टेशन तयार आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी आरोग्य सेवेसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

 

अलिबाग, दि.06 (जिमाका):- अतिवृष्टी होवून पूरपरिस्थिती, दरड कोसळणे अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्या ठिकाणच्या जनतेला तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याकरिता जिल्हा रुग्णालय रायगड-अलिबाग यांच्या अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय माणगाव, कर्जत व ग्रामीण रुग्णालय महाड आणि पोलादपूर या ठिकाणी ॲम्ब्युलन्स स्टेशन तयार करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालय माणगाव, कर्जत व ग्रामीण रुग्णालय महाड आणि पोलादपूर या ठिकाणी ॲम्ब्युलन्स स्टेशन तयार करण्यासाठी रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी, वाहन चालक उपलब्ध करुन देण्यात आले असून त्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे:-

उपजिल्हा रुग्णालय माणगाव: रुग्णवाहिका क्रमांक- एमएच-14 जेएल 3664, रुग्णवाहिका-108, वैद्यकीय अधिकारी, डॉ.सय्यद अफजान उल्हा हसेनी, भ्रमणध्वनी क्रमांक- 7276111598, वाहन चालक श्री.गजानन दळवी, भ्रमणध्वनी क्रमांक- 8806917209, रुग्णवाहिका क्रमांक- एमएच 06 बीडब्ल्यू 5395, रुग्णवाहिका-102, वाहन चालक श्री.अशोक महाडीक, भ्रमणध्वनी क्रमांक- 9158979762.

उपजिल्हा रुग्णालय कर्जत: रुग्णवाहिका क्रमांक- एमएच-14 सीएल 0588, रुग्णवाहिका- 108, वैद्यकीय अधिकारी, डॉ.बाहीद शेख, भ्रमणध्वनी क्रमांक- 7800904052, वाहन चालक श्री.प्रकाश देखमुख, भ्रमणध्वनी क्रमांक- 8080962250, रुग्णवाहिका क्रमांक- एमएच 06 जी 0039, रुग्णवाहिका- 102, वाहन चालक श्री.विश्वास नागावकर, भ्रमणध्वनी क्रमांक- 7350717648.

ग्रामीण रुग्णालय महाड: रुग्णवाहिका क्रमांक- एमएच-14 जेएल 3679, रुग्णवाहिका- 108, वैद्यकीय अधिकारी, डॉ.अमनउल्हा पारकर, भ्रमणध्वनी क्रमांक- 8793425992, वाहन चालक श्री.संदिप जाधव, भ्रमणध्वनी क्रमांक- 9850669969, रुग्णवाहिका क्रमांक- एमएच 06 बीडब्ल्यू 5817, रुग्णवाहिका- 102, वाहन चालक श्री.योगेश नातेकर, भ्रमणध्वनी क्रमांक- 7798026676.

ग्रामीण रुग्णालय पोलादपूर: रुग्णवाहिका क्रमांक- एमएच-14 जेएल 3665, रुग्णवाहिका- 108, वैद्यकीय अधिकारी, डॉ.अदिनाथ नागरे, भ्रमणध्वनी क्रमांक- 9322010219, वाहन चालक श्री.मोतीराम निकम, भ्रमणध्वनी क्रमांक- 9307728455, रुग्णवाहिका क्रमांक- एमएच 06 बीडब्ल्यू 4489, रुग्णवाहिका-102, वाहन चालक श्री.सचिन निकम, भ्रमणध्वनी क्रमांक- 7020013767.

उपजिल्हा रुग्णालय माणगाव, कर्जत व ग्रामीण रुग्णालय महाड आणि पोलादपूर या ठिकाणी ॲम्ब्युलन्स स्टेशन तयार करण्यात आले असून अतिवृष्टी होवून पूरपरिस्थिती, दरड कोसळणे अशा प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास येथील नागरिकांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड