जिल्हा परिषदा व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2022 आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

अलिबाग, दि.08 (जिमाका):- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम ,1961 मधील कलम 12 उपकलम(1),कलम 58(1)(अ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हापरिषदा व पंचायत समित्या(जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम,1996 नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेवून अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणी उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत.त्याकरीता आरक्षण निश्चित करण्याकरीता सोडत काढणे तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करून त्यावर हरकती व सूचना सादर करण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे:-

जिल्हा परिषदेचे नाव/पंचायत समितीचे नाव: रायगड जिल्हा परिषद, सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी दुपारी 3.00 वाजता, सभेचे ठिकाण- जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन सभागृह, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022, आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

पंचायत समिती, अलिबाग: सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- जंजिरा सभागृह, पोलीस मुख्यालय अलिबाग, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022, आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

पंचायत समिती, मुरुड: सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी दुपारी 3.00 वाजता, सभेचे ठिकाण- नानासाहेब धर्माधिकारी सभागृह पंचायत समिती कार्यालय दरबार हॉल मुरुड, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022,आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

पंचायत समिती, पेण: सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- तहसिलदार कार्यालय सभागृह पेण, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022,आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

पंचायत समिती, पनवेल: सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- क्रांतीवीर वासूदेव बळवंत फडके नाटयगृह पनवेल, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022,आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

पंचायत समिती, उरण: सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- पंचायत समिती सभागृह, उरण, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022,आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

पंचायत समिती, कर्जत: सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत, चार फाटा कर्जत येथील सभागृह, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022,आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

पंचायत समिती, खालापूर: सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- सरनौबत नेताजी पालकर सभागृह, तहसिल कार्यालय खालापूर, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022,आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

पंचायत समिती, रोहा: सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- कै.द.ग.तटकरे सभागृह पंचायत समिती रोहा, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022, आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

पंचायत समिती, सुधागड: सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- श्री.बल्लाळेश्वर देवस्थान, भक्त निवास क्र.1 सुधागड, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022, आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

पंचायत समिती, माणगाव: सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- मध्यवर्ती प्रशासकीय भवन सभागृह, पहिला मजला, तहसिल कार्यालय माणगाव, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022, आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

पंचायत समिती, तळा: सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, पहिला मजला, पंचायत समिती कार्यालय तळा, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022, आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

पंचायत समिती, महाड: सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- बहुउददेशीय सभागृह,डॉ.  बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड,ता.महाड, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022, आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

पंचायत समिती, पोलादपूर: सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी दुपारी 3.00 वाजता, सभेचे ठिकाण- कै.बॅ.नाथ पै.सभागृह पंचायत समिती कार्यालय पोलादपूर‍, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022, आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

पंचायत समिती, श्रीवर्धन: सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता, सभेचे ठिकाण- मध्यवर्ती प्रशासकीय भवन, पहिला मजला, तहसिल कार्यालय श्रीवर्धन, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022, आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

पंचायत समिती, म्हसळा: सभेची वेळ व तारीख- दि.13/07/2022 रोजी दुपारी 3.00 वाजता, सभेचे ठिकाण- पंचायत समिती सभागृह, पंचायत समिती कार्यालय म्हसळा, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दिनांक- दि.15/07/2022, आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- दि.15/07/2022 ते दि.21/07/2022.

जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची सदर सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील ठिकाणी व वेळी हजर राहावे, असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक