राष्ट्रीय लोकअदालत 13 जुलै रोजी


अलिबाग,रायगड,दि.4 (जिमाका)  :  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार संपूर्ण रायगड जिल्ह्यात शनिवार दि. 13 जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप मोहिते यांनी दिली आहे.
            या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी प्रकरणे,  138 एन.आय.ॲक्ट खालील प्रकरणे, दिवाणी अपिले, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे व अपिले ठेवली जाणार आहेत.  तसेच नगरपालिका व ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी, पाणीपट्टी बिलाच्या देयकांबाबतची वादपूर्व प्रकरणे,भारत दूरसंचार निगम,विज वितरण,राष्ट्रीयकृत बँका,पतसंस्था यांचे वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी लोक अदालतीत ठेवण्यात येतील.  राष्ट्रीय लोक अदालतीत प्रकरणे तडजोडीने निकाली काढल्यास लोकांचा वेळ व पैसा यांचा अपव्यय होत नाही.  पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो.  तरी या लोक अदालतीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग अभय वाघवसे यांनी केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक