निवासी क्रीडा प्रबोधिनी प्रवेश चाचणी 24 जून पासून जिल्ह्यातील खेळाडूंना लाभ घेण्याचे आवाहन



अलिबाग,रायगड,दि.4 (जिमाका) :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्री शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत निवाडी क्रीडा प्रबोधिनी करिता प्रवेश दिला जातो.  त्यासाठी प्रवेश चाचण्यांचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. प्रवेश प्रक्रिया ही सरळ प्रवेश प्रक्रिया पध्दतीने राबविली जाणार आहे.  राज्यस्तरावर पदक प्राप्त खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावर प्रतिनिधीत्व केलेले 19 वर्षे वयाच्या आतील खेळाडूंच्या चाचण्या तज्ज्ञ समिती घेईल.  त्यात पहिल्या टप्प्यात सरळ प्रवेश प्रक्रिया 24 ते 25 जून  रोजी होईल.  दुसऱ्या टप्प्यात खेळनिहाय कौशल्य चाचणी 25 ते 26 जून रोजी होईल.
            या चाचण्या क्रीडाप्रकार निहाय होणार आहेत.  त्यात आर्चरी क्रीडा प्रबोधिनी अमरावती येथे, हॅन्डबॉल क्रीडा प्रबोधिनी अकोला येथे तर ॲथेलेटिक्स, जलतरण शुटिंग, सायकलिंग, हॉकी,टेबलटेनिस, वेटलिप्टिंग, जिम्नॅस्टिक्स, कुस्ती,बॅडमिंटन या क्रीडा प्रकारांच्या चाचण्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी पुणे-45 येथे होतील.  चाचण्यांच्या दिवशी खेळाडूंनी त्या त्या तारखेस व ठिकाणी सकाळी  10 वा. उपस्थित रहावयाचे आहे.
            या चाचण्यांसाठी येणाऱ्या खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था करण्यात येणार नाही.  चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी आपल्या जिल्ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे स्वत:च्या नावाची व क्रीडा प्रकाराची नोंदणी करणे आवश्यक आहे.  खेळाडूंनी आपले प्रवेश अर्ज व संबंधित स्पर्धेचे प्राविण्य सहभाग प्रमाणपत्र चाचणीस्थळी उपस्थितीच्या दिनांकास सादर करावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी कळविले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक