वसतिगृह अधिक्षक पदासाठी तात्पुरती नेमणूक; अर्ज मागविले



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.3-  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड- अलिबाग यांच्या अखत्यारित असलेल्या सैनिकी मुलांचे वसतिगृह महाड येथे एकत्रिक मासिक मानधनावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात वसतिगृह अधिक्षक या पदावर अशासकिय  कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.  त्यासाठी सैन्यातून नायब सुभेदार या हुद्यावरुन निवृत्त झालेल्या एस.एस.सी पास व ज्यांचे वय 55 वर्षांपेक्षा अधिक नाही अशा उमेदवारांनी अर्ज पाठवावे. बायोडाटासह  हे अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड- अलिबाग येथे स्वहस्ते अथवा कार्यालयाच्या इ-मेल आयडी zswo_raigad@mahasainik.com वर 15 जून पर्यंत  कार्यालयीन वेळेत पाठवावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे. त्यानंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही, असेही त्यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक