जावळी ता.माणगाव येथे शैक्षणिक वर्षे 2019-20 करिता मोफत प्रवेश




अलिबाग, जि. रायगड, दि.7 (जिमाका)-सामाजिक न्याय व दि.विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा जावळी ता.माणगाव येथे शैक्षणिक वर्षे 2019-20 करिता इयत्ता 6 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्याकरिता मोफत प्रवेश दिला जात आहे.
            या शाळेमध्ये विद्यार्थी प्रवेशाकरिता पुढीलप्रमाणे आरक्षण आहे.  अनुसूचित जाती 80 टक्के, अनुसूचित जमाती 10 टक्के, अपंग प्रवर्ग 3 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के.   शासकीय निवासी शाळेची वैशिष्टये पुढीलप्रमाणे- शाळा विभाग व निवासकरिता स्वतंत्र इमारती.  शासनामार्फत विनामूल्य राहण्याची, जेवाणाची सोय.  विनामूल्य गणवेश व शैक्षणिक साहित्य आणि निवासी साहित्य.  सुसज्य ग्रंथालय,प्रयोगशाळा व संगणक कक्ष, भव्य खेळाचे मैदान व क्रीडा साहित्य, डिजिटल स्कूल,म्युझिक सिस्टीम व दुरदर्शन संच.
            कार्यालयात उपलब्ध्‍ प्रवेश अर्ज विहित नमुन्यात पुढील कागदपत्रासह सादर करावा. विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला स्वत:चा नसल्यास वडिलांचा.  पालकांचा उत्पन्नाचा दाखला.  रहिवाशी दाखला (सरपंच,पोलीस पाटील), विद्यार्थ्यांच्या आधीच्या वर्षाची मार्कलिस्ट, पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्ड, अपंग असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे अपंग प्रमाणपत्र.
            शासकीय निवासी शाळेची प्रवेश प्रक्रिया दि.1 एप्रिल 2019 पासून सुरु झाली असून शाळेत प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड अलिबाग दूरध्वनी क्र.02141-222288 किंवा अनुसूचित जाती व नवबौध्द  विद्यार्थ्यांची शासकीय निवासी शाळा जावळी ता.माणगाव सहा.शिक्षक मो.9511228654 येथे संपर्क साधावा. 
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक