जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समिती बैठक:जिल्हा कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी 2 कोटी 22 लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता


अलिबाग दि.18,(जिमाका) :- जिल्ह्यातील युवकांना स्थानिक भौगोलिक स्थिती, सामाजिक स्थिती, अपरंपरागत व्यवसाय उपलब्ध नैसर्गिक संसाधने आदींच्या आधारे विविध क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी स्व. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत 2 कोटी 22 लाख रुपयांच्या कौशल्य विकास प्रशिक्षण आराखड्यास आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
 जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी हे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती मृ.न.देशमुख, जिल्हा  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक एस.जी. पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक संचालक पवार यांनी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा आराखडा सादर केला. त्यानुसार बॅंकिंग ॲण्ड अकाऊंटींग, सीएनसी ऑपरेटर, बांधकाम क्षेत्र, वाहतूक आणि पर्यटन, माल वाहतूक, माल साठवणूक आणि पॅकिंग, फॅब्रिकेशन अशा विविध व्यवसायांची 500 हून अधिक बॅचेस मध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहेत.
त्यासाठी जिल्ह्यात  याच व्यवसायांशी संबंधित 8 कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था कार्यरत असून वर्षभरात हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येणार आहेत. एकूण 3350 तास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात काही निवासी प्रशिक्षणे आहेत. एकूण प्रशिक्षणांसाठी व त्यासाठीच्या अनुषंगिक व्यवस्थांसाठी 2 कोटी 22 लाख 17 हजार 525 रुपयांचा आराखडा यावेळी सादर करण्यात आला. त्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली, अशी माहिती सहाय्यक संचालक एस. जी. पवार यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सागरी किनारपट्टीवर प्रशिक्षित जीवरक्षक, तसेच नारळाच्या काथ्यांपासून वस्तू निर्मिती आदी प्रशिक्षणांचाही या कार्यक्रमात समावेश करावा, अशी सुचना केली.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड