जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे आवाहन

अलिबाग दि.19,(जिमाका):- सर्वेाच्च न्यायालयाच्या आदेशान्वये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या  शिक्षणासाठी जात वैधता प्रमाणपत्र प्राधान्यांने निकाली काढण्याचे आदेश दि.10 ऑगस्ट 2017 रोजी निर्गमित झाले आहेत. ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न करता केवळ Undertaking देवून प्रवेश घेतला आहे, अशा  विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन प्रवेश रद्द होणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 12 वी नंतर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे, अशा विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळणेकरिता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, प्रशासकीय इमारत,गोंधळपाडा,ता.अलिबाग जि.रायगड येथे प्रस्ताव सादर करावेत. ज्या विद्यार्थ्यांना अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन उपआयुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र समिती,अलिबाग-रायगड यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड