अद्ययावत महाड बसस्थानकामुळे कोकणच्या विकासात भर- ना.अनंत गिते


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि. 7:-  महाड येथील एसटी स्थानक हे कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा दुवा असून या ठिकाणी सुंदर अद्ययावत बसस्थानक उभे राहणे गरजेचे होते. महाड येथील अद्ययावत एस.टी. बस स्थानक हे कोकणाच्या वैभवात व विकासात भर टाकेल,असा विश्वास केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना. अनंत गिते यांनी महाड येथील नुतन एसटी स्थानकाच्या भूमिपुजनप्रसंगी व्यक्त केला.
याप्रसंगी व्यासपीठावर विधान परिषद सदस्य आ. निरंजन डावखरे, महाडचे आमदार भरत शेठ गोगावले,आ.प्रविण दरेकर, प्रांताधिकारी इनामदार, तहसिलदार पवार, एस.टी.विभाग नियंत्रक श्रीमती बारटक्के, महाड पं. स. सभापती सपना मालुसरे, महाडचे उपनगराध्यक्ष वजीर कोंडीवकर, महाड आगारप्रमुख कुलकर्णी उपस्थित होते
यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री ना. गिते यांनी  सांगितले की, भारतातील उत्तम परिवहन सेवा देण्यात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. महाडकरांची गेल्या अनेक वर्षापासून कोकण रेल्वे महाड शहराला जोडण्याची असणारी मागणी पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे सांगून ना. गिते म्हणाले की, साईडींग मंगूर झाल्यानंतर पेण-अलिबागच्या धर्तीवर महाडकरीता स्वतंत्र प्रवासी वाहतूक सुरू करता येईल,असे आश्वासन ना. गिते यांनी दिले.  यावेळी महाड शहरातील नागरिक, प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक