मतदार नोंदणी विशेष अभियान जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवशींनी केली मतदान केंद्रांची पाहणी



अलिबाग,जि. रायगड,दि.३(जिमाका)- मतदार नोंदणी विशेष अभियान (२ व ३ मार्च) निमित्त जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दोन दिवस जिल्ह्यातील दुर्गम भागातील तसेच अन्य विविध भागातील मतदान केंद्रांची पाहणी केली, शिवाय तेथे होत असलेल्या मतदार नोंदणीचा आढावा ही घेतला.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, शनिवार दि.२व रविवार दि.३ असे दोन दिवस विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानात रायगड जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.
या मोहिमेत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी
डॉ.विजय सूर्यवंशी यांनी काल तळा तालुक्यातील मतदान केंद्रांची पाहणी केली. तर आज (रविवारी)जिते, खरोशी ता.पेण तसेच पनवेल तालुक्यातील मतदान केंद्रास भेट देऊन तेथील सोयी सुविधांची पाहणी केली.
            जिल्ह्याभरात दिवसभर नवीन मतदार नोंदणी, नावे वगळणे, पत्ता बदल आदी कामांसाठी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी कर्मचाऱ्यांकडे संपर्क करीत होते. दिवसभर नाव नोंदणीसाठी लोक मतदान केंद्रांवर जाताना दिसत होते.यासंदर्भात संपूर्ण जिल्ह्यातून माहिती संकलित करून नेमकी आकडेवारी उद्यापर्यंत उपलब्ध होऊ शकेल असे निवडणूक शाखेतून सांगण्यात आले.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक