जागतिक महिला दिनःमहिला मतदारांनी आपली नावे नोंदवावीत- जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी



अलिबाग, जि. रायगड, दि.7(जिमाका)- जागतिक महिला दिनानिमित्त शुक्रवार दि.8 रोजी महिला मतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
यासंदर्भात जिल्हा निवडणूक शाखेकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  मा.मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार दिनांक 01/01/2019 या अर्हता दिनांकावर आधारित अंतिम मतदार यादी दिनांक 31/1/2019 रोजी प्रकाशीत करण्यात आली आहे. मतदार यादीमध्ये महिला मतदारांचे प्रमाण वाढविणे तसेच महिलांचा निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग वाढण्यासाठी दिनांक 8 मार्च 2019 रोजी सर्वत्र साजरा होणाऱ्या जागतीक महिला दिनाचे औचित्य साधुन प्रयत्न होत आहेत. तरी जिल्हयातील सर्व पात्र महिला मतदारांनी त्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी संबंधीत मतदार नोंदणी अधिकारी व सहा. मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे आवश्यक त्या पुराव्यासह नाव नोंदणीसाठी अर्ज दाखल करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक