रायगडकरांना लवकरच उपलब्ध होणार अद्ययावत कौटुंबिक न्यायालयाची सुविधा

 


          अलिबाग,जि.रायगड, दि.18 (जिमाका) :-  विधी व न्याय विभागाच्या दि.18 ऑगस्ट, 2017 च्या शासन निर्णयान्वये 14 व्या वित्त आयोगांतर्गत राज्यात 5वर्षाच्या कालावधीकरिता 9 कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यामध्ये रायगड-अलिबाग येथील कौटुंबिक न्यायालयाचाही समावेश होता. तद्नंतर हे कौटुंबिक न्यायालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याकरिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी विविध बाबींसाठी शासनाकडे पाठपुरावा केला.

त्यानुसार 14 व्या वित्त आयोगांतर्गत अलिबाग, जिल्हा रायगड येथील प्रस्तावित कौटुंबिक न्यायालयाकरीता फर्निचर पुरवठा करण्यासाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग यांनी प्रस्तावित केलेल्या 24 लक्ष 4 हजार 413 रुपये इतक्या रक्कमेच्या अंदाजपत्रकातून 5 % Centage Charges वगळून  23 लक्ष 91 हजार 876 रुपये इतक्या रक्कमेच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता लवकरच रायगड जिल्ह्यातील जनतेला उत्तम अशा कौटुंबिक न्यायालयाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक