पेण परिवहन कार्यालयाच्या वतीने शिकाऊ वाहनचालकांसाठी मुरुड येथे रस्ता सुरक्षा अभियान उपक्रम संपन्न

 



अलिबाग,जि.रायगड, दि.21 (जिमाका)  :- परिवहन कार्यालय, पेण (रायगड) च्या वतीने दि.20 जानेवारी  रोजी  मुरुड येथील शिबीर कॅम्प येथे शिकाऊ अनुज्ञप्ती आणि वाहनचालक चाचणीसाठी आलेल्या अर्जदारांना मोटार वाहन निरीक्षक यांनी 32 वे रस्ता सुरक्षा अभियान 2021 च्या निमित्ताने माहितीपत्रके वाटली. तसेच वाहतूक नियमांचे महत्व विषद करणारे व्याख्यान आयोजित  केले. 

            32 व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे घोषवाक्य सडक सुरक्षा जीवन रक्षा असे असून सडक सुरक्षा जीवन रक्षा हे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे व सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे ,याबद्दल मोटार वाहन निरीक्षक श्री. किरण पाटील व श्री. दिपक कोकणे यांनी मार्गदर्शन केले. मोटार वाहन निरीक्षक श्री.पाटील व कोकणे यांनी यावेळी वाहतूक नियमांची व चिन्हांची माहिती असलेली माहितीपत्रके वाटली. तसेच जीवनदूत' म्हणून कार्य करणे आवश्यक आहे, याबाबतचे महत्व विषद केले. विशेषतः अपघातग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिली.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक