ना.चव्हाण यांनी केली राजपुरी जेट्टीची पाहणी



अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.12-  दरम्यान काल (दि.11) सायं. 6 वा. मुरुड तालुक्यातील राजपुरी येथील जेट्टीची पाहणी राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी केली. यावेळी पालकमंत्री चव्हाण यांनी जेटीची पहाणी करून जलवाहतुकीच्या समस्या जाणून घेतल्या. सर्व जलवाहतूक व्यवस्थापकांनी नियमाचे पालन करून प्रवाशांना चांगल्या सुविधा द्याव्यात. ज्या शिडाच्या बोटींना परवानगीसाठी लागणारी मदत अधिकाऱ्यांनी करावी . प्रवाशाची कुचंबना होऊ नये,असे निर्देश त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना व वाहतुकदारांना दिले. यावेळी ना. चव्हाण यांच्या समवेत सतीश धारप ,कृष्ण कोबक, मिलिंद पाटील,महेश मोहिते,संजय कोनकर,वृषाली कोचरेकर ,प्रवीण बैकर,महेश मानकर ,आदी उपस्थित होते. 
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक