मतदार याद्या शुद्धीकरण मतदारांचे रंगीत छायाचित्रे गोळा करण्याचे काम सुरु


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13- मतदार याद्या शुद्धिकरण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात ज्या मतदारांचे मतदार यादीत फोटो नाहीत किंवा ब्लॅक ॲण्ड व्हाईट फोटो आहेत अशा मतदारांचे रंगीत फोटो गोळा करण्याचे काम सुरु आहे. त्यानुसार मतदारांनी मतदार यादीत आपला फोटो आहे किंवा नाही आणि असल्यास तो रंगीत आहे की नाही याची खात्री करावी. त्यासाठी ceo.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर जाऊन खात्री करावी. पनवेल उरण भागात हे काम सुरु असून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी , तलाठी यांचे मार्फत रंगीत फोटो गोळा करण्याचे काम सुरु आहे. मतदारांना या संदर्भात काही अडचण असल्यास तहसिल कार्यालय, पनवेल येथे संपर्क करावा, असे आवाहन सहा. मतदार नोंदणी अधिकारी पनवेल, उरण विधानसभा मतदार संघ यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक