डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिल्हा प्रशासनातर्फे विनम्र अभिवादन



अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.14- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त आज अलिबाग येथील एस.टी.स्टॅण्ड,महेश टॉकीजच्या बाजूला असलेल्या पुतळ्यास केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.   यावेळी आमदार पंडितशेठ पाटील, जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनीही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना  अभिवादन

       डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात समिती सभागृहात जिल्हा प्रशासनातर्फे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीधर बोधे  यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन  केले.  यावेळी तहसिलदार के.डी.नाडेकर तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक