करोनाने अनाथ झालेल्या बालकांसाठी जिल्हा कृतीदल चाईल्ड हेल्पलाईनच्या 1098 या क्रमांकावर माहिती द्यावी - जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

 


अलिबाग,जि.रायगड, दि.24(जिमाका):  करोनामुळे निधन झाल्यानंतर त्या पालकांवर अवलंबून असलेल्या बालकांच्या जीवनावरही गंभीर परिणाम होत आहेत. अशा बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दल (Task Force) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

      यानुषंगाने कोविड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर बालकांची काळजी व संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कृतीदलाची बैठk नुकतीच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.

         या बैठकीस जिल्हा परिविक्षा अधिकारी अशोक पाटील, बाल कल्याण समिती सदस्य, रोशनी ठाकूर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सुजाता सपकाळ, चाईल्ड लाईन सदस्य उपस्थित होते.

        करोनामुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यानंतर निराधार झालेल्या बालकांची माहिती जनतेने द्यावी. निराधार बालकांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी जिल्हा कृती दलामार्फत घेण्यात येणार असून निराधार बालकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जिल्हा कृती दलाच्या माध्यमातून या बालकांच्या संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात येवून त्या बालकास बालगृहात दाखल करून घेण्यात येणार आहे. यासाठी चाईल्ड हेल्पलाईन क्र.1098 यावर सुध्दा संपर्क साधता येईल. करोनामुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झालेल्या 0 ते 6 वर्ष या  वयोगटातील बालकांसाठी एक शिशुगृह व 6 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांसाठी दोन बालगृह निश्चित केली आहेत. यासंदर्भातील माहिती कोविड हॉस्पिटल व मदत केंद्रांनासुध्दा उपलब्ध करून दिल्यामुळे मदत उपलब्ध करुन देणे सुलभ झाले आहे. अडचणीत सापडलेल्या बालकांबाबत संबंधित रुग्णालयाने तात्काळ माहिती कळवावी तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग येथे  02141-295321 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन प्र.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, रायगड अलिबाग अशोक पाटील यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक