खालापूर तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,आसरे साठी मौजे धारणी येथील जागा हस्तांतरित

 


 

अलिबाग, जि.रायगड दि.25 (जिमाका):- खालापूर तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,आसरे इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

     या पार्श्वभूमीवर मौजे धारणी ता.खालापूर येथील स.नं.15/0 क्षेत्र 3.49.00 हे.आर.पैकी 0-05-0 हे.आर. या जमिनीचे शासनाकडे पुर्नग्रहण करुन जमीन भोगाधिकार मूल्यरहित व महसूल मुक्त किंमतीने मौजे धारणी ता.खालापूर येथील जागा नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आसरे करिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.

     खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे. 

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक