राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांनी दि.07 जून पर्यंत महाडीबीटी प्रणालीवर कागदपत्रांची पूर्तता करावी

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.27 (जिमाका):- राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी निवडीची राज्यस्तरावरुन महाडीबीटी पोर्टलवर तिसऱ्यांदा लॉटरी काढण्यात आली. त्यामध्ये माणगाव-5, कर्जत-10, रोहा-5, महाड-8, सुधागड-3, अलिबाग-2, खालापूर-5, मुरुड-1, पनवेल-1, पोलादपूर-5, श्रीवर्धन-1, तळा-3 या तालुक्यातील अशा एकूण 49 लाभार्थ्याची निवड करण्यात आली आहे.

              निवड झालेल्या लाभार्थ्यास त्याच्या आधार लिंक असलेल्या मोबाईलवर एसएमएस संदेश पाठविण्यात आला आहे.     तरी या लाभार्थ्यांनी दि.07 जून 2021 पर्यंत महाडीबीटी प्रणालीवर कागदपत्रांची पूर्तता करावी तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत कृषी अवजार खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती घेऊन कृषी अवजारे खरेदीची प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया पूर्ण करण्यात काही अडचण उद्भवल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक