खालापूर तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, वासांबे करिता मौजे वासांबे येथील जागा हस्तांतरित
अलिबाग,
जि.रायगड दि.25 (जिमाका):- खालापूर तालुक्यातील नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, वासांबे
इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी
व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.
या पार्श्वभूमीवर मौजे वासांबे ता.खालापूर येथील
स.नं.52/1अ/1 क्षेत्र 4.09.76 हे.आर.पैकी 0-05-0 हे.आर. या जमीनीचे शासनाकडे पुर्नग्रहण
करुन जमीन भोगाधिकार मूल्यरहित व महसूल मुक्त किंमतीने मौजे वासांबे ता.खालापूर येथील
जागा नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,वासांबे करिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या
निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.
खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य
सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे.
000000
Comments
Post a Comment