अल्पसंख्याक शाळांमधील पायाभुत सुविधा विकासासाठी अनुदान; 30 पर्यंत प्रस्ताव मागविले



अलिबाग, जि. रायगड, दि.12 (जिमाका)- जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक  विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा. कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा  पुरविण्यासाठी राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून अनुदान दिले जाते. रायगड जिल्ह्यातील इच्छूक शाळांनी  सन 2018-19 या आर्थिक वर्षा करीता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड- अलिबाग यांच्याकडे येत्या 30 ऑक्टोबर पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव उच्चस्तरीय निवड समिती रायगड अलिबाग यांनी केले आहे.  
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड