कळंबोली येथे रोजगार मेळाव्यात 242 उमेदवारांना नोकरीची संधी



अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.11- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग व सक्षम स्कील ॲकेडमी कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने आणि के.एल.ई. उच्च महाविद्यालय  यांच्या सहकार्याने  पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विविध सेक्टर मधील 20 आस्थापना आपल्याकडील 450 उमेदवारांच्या मुलाखतीकरिता उपस्थित होते.  मेळाव्यात 545 उमेदवार हजर होते त्यापैकी 242 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.  या मेळाव्यात https://mahaswayam.gov.in वेबपोर्टलचे सादरीकरण करण्यात येऊन आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ योजनेचे सादरीकरणाद्वारे करुन मुद्रा योजनेची माहिती उपस्थितांना देण्यात आली.मेळाव्यासाठी सहा कौशल्य प्रशिक्षण संस्था उपस्थित होत्या.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक