आपत्कालीन स्थितीत आवश्यक असणारे रेस्क्यू (विमोचन) साहित्य होमगार्ड संघटनेस जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते सुपूर्द

  


अलिबाग,दि.24(जिमाका):- होमगार्ड संघटना ही मानसेवी संघटना ही मानसेवी स्वरुपाची असून पोलीस दलास सहाय्यकारी म्हणून कार्यरत आहे. आपत्कालीन स्थितीत स्थानिक प्रशासनाला मदत कार्यातही सहकार्य करते. त्या उद्देशाने मानसेवी होमगार्ड सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येवून त्यांना मदत कार्यात सहभागी करून घेतले जाते. आपत्कालीन स्थितीत आवश्यक असणारे रेस्क्यू (विमोचन) साहित्य होमगार्ड कार्यालयाकडे उपलब्ध असल्यास त्याचा उपयोग होमगार्डना प्रशिक्षण देण्यासाठी करता येवू शकतो. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेनुसार जिल्हा समादेशक, गृहरक्षक दल तथा अपर जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड यांना हायबीम सर्च लाईट – 4, एल.ई.डी फ्लड लाईट विथ बॅटरी ऑपरेटर – 4, 8mm रोप, 10mm रोप, 12mm रोप (प्रत्येकी 100 मीटर), वॉकी टॉकी हॅण्ड सेट - 4, फर्स्ट एड बॉक्स - 5, तंबू - 5, मेगा फोन - 2, चेन सॉ/वूड कटर – 2 हे साहित्य आज दि.24 मार्च 2022 रोजी उपलब्ध करुन देण्यात आले.

साहित्य वाटप कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा समादेशक तथा अपर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अतुल झेंडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे, तहसिलदार (महसूल) सचिन शेजाळ, तहसिलदार विशाल दौंडकर, तहसिलदार अलिबाग श्रीमती मिनल दळवी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक व इतर अधिकारी उपस्थित होते.

यापुढेही गृहरक्षक दलातील स्वयंसेवकांना विविध संस्थांकडून प्रशिक्षण व साहित्य उपलब्ध देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी यावेळी दिल्या. तसेच चक्रीवादळ, पूर, दरड कोसळणे इ. नैसर्गिक आपत्तींमध्ये आवश्यक असणारे साहित्य तहसिल स्तरावर देखील उपलब्ध करुन देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांच्या संकल्पनेनुसार पोलीस दल व गृहरक्षक दलातील 40 अधिकारी/कर्मचारी, स्वयंसेवकांना भुवनेश्वर येथे चक्रीवादळ आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. जिल्हयातील गृहरक्षक दलास साहित्य उपलब्ध झाल्याने गृहरक्षक दलाची क्षमता वाढल्याचे अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी यावेळी सांगितले.

             

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक