महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा, प्रादेशिक परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे निरीक्षण गृह, बाहगृह कर्जत येथील संस्थेत रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.

 


 


अलिबाग,दि.25(जिमाका):- जिल्हा प्रादेशिक परिवीक्षा अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे निरिक्षण गृह, बालगृह कृषी उत्पन्न बाजार समिती आवार कर्जत मुरबाड रोड, एच. पी. पेट्रोल पंपाजवळ दहिवली, कर्जत या ठिकाणी खालील अ.क्र. 1 ते 7 पदे, बाल न्याय मंडळ कर्जत व बाल कल्याण समिती कर्जत येथे अ.न.8 ही सर्व पदे 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर भरावयाचे आहेत. त्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

समुपदेशक-1 पद, मासिक मानधन रु.17 हजार 500, शैक्षणिक अर्हता-मान्यताप्राप्त विद्यापीठाची मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समाजकार्य विषयात पदव्युत्तर पदवी, एम.एस.सी.आयटी किंवा तत्सम अर्हता, वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष, अनुभव- बालकांच्या क्षेत्रात कामकाज अनुभव असल्यास प्राधान्य.

 परिवीक्षा अधिकारी- 1 पद, मासिक मानधन रु.17 हजार 500, शैक्षणिक अर्हता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (एम.एस.डब्ल्यू असल्यास प्राधान्य.) एम.एस.सी.आयटी किंवा तत्सम अर्हता, वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष, अनुभव- शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थेत बालकांसोबत कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

 भांडार रक्षक तथा लेखापाल-1 पद, मासिक मानधन रु.14 हजार, शैक्षणिक अर्हता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (बी.कॉम असल्यास प्राधान्य.) एम.एस.सी.आयटी किंवा तत्सम अर्हता, मराठी टायपिंग 40 व इंग्रजी टायपिंग 30 असणे आवश्यक, वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष, अनुभव- शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थेत बालकांसोबत कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

 निमवैद्यकीय कर्मचारी-1 पद, मासिक मानधन रु.9 हजार, शैक्षणिक अर्हता-मान्यताप्राप्त संस्थेची ए.एन.एम/जी.एन.एम.पदवी, वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष, अनुभव-वैद्यकीय क्षेत्रात कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य. 

स्वयंपाकी- 1 पद, मासिक मानधन रु.7 हजार 500, शैक्षणिक अर्हता- सातवी, वयोमर्यादा 34 ते 50 वर्ष, अनुभव-शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थेत स्वयंपाकाचा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

 मदतनीस-1 पद, मासिक मानधन रु.6 हजार, शैक्षणिक अर्हता-एस.एस.सी., वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष, अनुभव- शारीरीक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक.

 गृहरक्षक-1 पद, मासिक मानधन रु.6 हजार, शैक्षणिक अर्हता-एस.एस.सी., वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष, अनुभव- शारीरीक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक.

 डाटा एन्ट्री ऑपरेटर-2 पदे, मासिक मानधन रु.9 हजार, शैक्षणिक अर्हता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (बी.कॉम असल्यास प्राधान्य.) एम.एस.सी.आयटी किंवा तत्सम अर्हता, मराठी टायपिंग 40 व इंग्रजी टायपिंग 30 असणे आवश्यक, वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष, अनुभव- शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थेत डाटा एन्ट्री बाबतचा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

इच्छुक उमेदवारांनी विहीत नमुन्यातील अर्ज दि.28 मार्च ते दि.19 एप्रिल 2022 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, रायगड, निलपुष्प बिल्डींग, एमआयडीसी ऑफीस समोर, नागडोंगरी, चेंढरे, अलिबाग या कार्यालयात सादर करावेत. तसेच दि.19 एप्रिल 2022 सायंकाळी 06.00 वाजल्यानंतर कोणतेही प्रकारचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

ही पदे 11 महिन्यांकरिता पूर्ण अस्थायी व कंत्राटी तत्वावर असल्याने शासनाचे आरक्षणाबाबत व इतर बाबीचे कोणतेही नियम लागू नाही. विविध दिनांक व वेळेनंतर कोणताही अर्ज कोणत्याही कारणास्तव स्विकारला जाणार नाही. अर्ज स्वीकृत झालेल्या पात्र उमेदवारांना मुलाखतीस बोलाविण्यात येईल. अर्ज स्वीकृत करण्याचे पदांच्या संख्येत बदल करणे व कंत्राटी पदभरती प्रक्रिया कोणत्या टप्प्यात कोणत्याही कारणास्तव रद्द किंवा स्थगित करण्याचे अंतिम अधिकार निवड समितीस राहतील. अर्जदार हा अनाथ असल्यास त्याच्याकडे महिला व बाल विकास विभागाचे अनाथ प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य देण्यात येईल. परिवीक्षा अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे निरीक्षणगृह बालगृह या संस्थेतील कार्यरत/ अनुभवी मानधनी कर्मचारी असल्यास प्राधान्य देण्यात येईल. उमेदवार हा स्थानिक रायगड जिल्ह्यातील असल्यास प्राधान्य देण्यात येईल. संपर्क अधिकारी  श्री.योगीराज जाधव परिविक्षा अधिकारी मो. नं. 9970122623 आणि श्रीमती सुजाता सपकाळ संस्था अधीक्षक मो. नं. 7775018197.

00000

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक