प्रयोगात्मक कलाकारांना कोविड-19 दिलासा पॅकेज; राज्यात 35 कोटी रुपयांची तरतूद: पाच हजार ते दोन लाखांपर्यंत अनुदान

 

अलिबाग,दि.23(जिमाका):- लॉकडाऊनच्या काळात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन बंद असल्याने विविध कलाकारांना उत्पन्नापासुन वंचित राहावे लागले. प्रयोगात्मक कला प्रकारातील कलाकार, कलासमूह यांना एकरकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील कलावंतांसाठी 35 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

कलावंताना गटविकास अधिकारी, पंचायत समिती मार्फत किंवा तहसिल कार्यालयामार्फत जिल्हा समाज कल्याण विभाग, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांच्याकडे अर्ज सादर करावे लागणार आहे व या योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज हा पंचायत समिती व तहसिल कार्यालय, जिल्हा समाज कल्याण विभाग, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांच्याकडे उपलब्ध आहे. तसेच रायगड जिल्ह्याच्या https://raigad.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

प्रति कलाकार पाच हजार रुपयांपर्यंत एकरकमी अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी कलावंताना विहित नमुन्यातील अर्ज गट विकास अधिकारी, पंचायत समिती मार्फत किंवा तहलिस कार्यालयामार्फत जिल्हा समाज कल्याण विभाग रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांच्याकडे सादर करावे लागणार आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झाल्याने राज्यासह देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतरही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, सादरीकरण व त्यातून येणाऱ्या उत्पन्नापासून वंचित राहावे लागले.

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येणारे कार्यक्रमही या काळात स्थगित करण्यात आले होते. कलाकारांच्या उपजीविकेचे साधन केवळ सांस्कृतिक कार्यक्रम व कला सादर करणे असून अशा कलावंताना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. कलावंताना आर्थिक मदत देण्याची मागणी सर्वच स्तरातून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलासा पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रति लाभार्थी (एकल कलाकार) रु.5 हजार आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

त्यानुसार आर्थिक अनुदानासाठी पात्रता व निकष पुढीलप्रमाणे: महाराष्ट्र राज्यात प्रयोगात्मक कलेतील केवळ कलेवर उपजीविका असणारे आर्थिकदृष्टया दुर्बल कलाकार यासाठी पात्र राहतील. महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्य असावे, कलेच्या क्षेत्रात 15 वर्षे कार्यरत, वार्षिक उत्पन्न 48 हजार रुपयांच्या कमाल मर्यादित असणे आवश्यक आहे (तहसिलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र) तर केंद्र शासन व राज्य शासनाच्या जेष्ठ कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना, इतर वैयक्तिक शासकीय अर्थसहाय्याच्या योजनांचा लाभ घेणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, वैयक्तिक (एकल) कलावंतानी पंचायत समिती किंवा तहसिल कार्यालयामार्फत जिल्हा समाज कल्याण विभाग, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांजकडे अर्ज करावेत व समूह/ संस्था/फड/ पथके यांनी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, एम.जी.रोड, मुंबई- 400032/ सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, पहिला मजला, विमानतळ मार्ग, येरवडा, पुणे 411006 यांच्याकडे अर्ज करावेत.

कलाकार लाभार्थ्यांनी अर्ज दि.23 मार्च ते 28 मार्च 2022 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरून व त्यात दिलेल्या आवश्यक कागदपत्रांसह गटविकास अधिकारी, पंचायत समिती किंवा तहसिल कार्यालयामार्फत जिल्हा समाज कल्याण विभाग, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांच्याकडे सादर करण्यात यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, एकल कलाकार जिल्हा निवड समिती डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

 

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक