छोट्या व्यवसायातून गगनभरारी घेण्यासाठी सरसावल्या बचतगटाच्या महिला

  


अलिबाग,दि.24(जिमाका):- महिला आर्थिक विकास महामंडळ, रायगड तसेच युनायटेड वे मुंबई फाउंडेशन यांच्या वतीने दि.21 मार्च 2022 रोजी नवी मुंबई व पनवेल महानगरपालिकेतील ज्या महिलांचे कोरोना कालावधीत उद्योग व्यवसाय बंद झाले किंवा ज्यांना नव्याने घरगुती व्यवसाय चालू करणे आहे किंवा टेलरिंग येते पण मशीन घेऊ शकत नाही अशा एकूण 94 महिलांना नुकतेच त्यांना छोट्या छोट्या व्यवसायातून गगनभरारी घेता यावी यासाठी वस्तू रुपात साहित्य वाटप करण्यात आले.

त्यातील 47 महिलांना शिलाई मशीन, 20 महिलांना घरघंटी, 12 महिलांना ब्युटी पार्लर किट, 1 महिलांना केक तयार करण्याचे किट तसेच 14 महिलांना फूड सर्व्हिसचे किट असे साहित्य वाटप करण्यात आले. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ व युनायटेड वे मुंबई फाउंडेशन यांच्याकडून ही या महिला बचतगटातील महिलांचा पाठपुरावा करण्यात येईल. जेणेकरून या किट किंवा या मदतीमुळे त्यांना कसा फायदा झाला किंवा होत आहे हे माहीत करून घेतला जाईल, असे सांगण्यात आले.

या किट वाटप कार्यक्रमास पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त श्री.गावडे, सहायक आयुक्त श्री.विधाते, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहायक जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा पाटील, युनायटेड वे मुंबई फाउंडेशनचे पदाधिकारी श्री.संदेश पवार, जिल्ह्यातील लेखाधिकारी माधुरी देवीकर, एम आय एस अधिकारी दीपक पोटभरे, पनवेल nulm च्या SMID म्हात्रे, श्री.थोरात, नवी मुंबई nulm SMID चे तुषार पवार तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या क्षेत्र समन्वयक रुपाली मोहिते, राकेश कांबळे, रेखा साळवी व बचतगटाच्या महिला उपस्थित होत्या.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक