जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विषयक कार्यशाळा संपन्न


अलिबाग,दि.25(जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील पुरवठा विषयक बाबींसंदर्भात रास्त भाव धान्य दुकानदार, पेट्रोल पंप व डिझेल पंपधारक, एल.पी.जी. गॅस वितरक, खाद्यतेल व खाद्यतेलबियांचे व्यापारी, शिवभोजन केंद्र चालक/मालक, ऑईल कंपन्यांचे जिल्हा संघटक व असिस्टंट मॅनेजर, तालुका पुरवठा शाखेतील अधिकारी-कर्मचारी यांची आज दि.25 मार्च 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.मधुकर बोडके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यशाळेमध्ये उप नियंत्रक, वैधमापन शास्त्र श्री.राम राठोड, अन्न व औषध प्रशासन विभाग, रायगडचे सहाय्यक आयुक्त श्री.लक्ष्मण दराडे, भारत पेट्रोलियम गैस कंपनीचे मॅनेजर श्री.विशाल काबरा, आय.ओ.सी. कंपनीचे श्री.मणिकंदन मुरलीधरण यांनी मार्गदशन केले. तर रायगड जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे कार्याध्यक्ष श्री.शेखर देशमुख, पेट्रोल पंप धारक श्री.बाळकृष्ण पाटील, शिवभोजन केंद्र चालक श्रीमती जेधे, रास्त भाव धान्य दुकानदार, सुधागड तालुका अध्यक्ष श्री.हरिश्चंद्र पाटील, रास्त भाव धान्य दुकानदार श्री.कौस्तुभ जोशी व श्री.अच्युत आपटे व माणगाव पुरवठा निरिक्षण अधिकारी श्री.संजय माने यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.गाविद वाकडे यांनी केले. तर जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.मधुकर बोडके यांनी पुरवठा विषयक बाबीचे मार्गदर्शन केले तसेच आगामी काळात शासनाकडून सीएससी सेंटरच्या माध्यमातून राज्यातील रास्त भाव दुकानदार बँकांचे सर्व व्यवहार, रेल्वे विमान तिकिट बुकींग, सर्व प्रकारचे बिल्स उदा.लाईट बिल, फोन बिल, पाणी बिल, हेल्थ केअर सर्व्हिसेस, मोबाईल डीटीएच रिचार्ज, शेती विषयक सर्व सेवा, इन्कम टॅक्स रिटर्न भरणे, नवीन रेशन कार्ड, दुबार रेशन कार्ड, नावामध्ये दुरुस्ती अर्ज इत्यादी सेवा देऊ शकतील. राज्यातील रास्त भाव दुकानदारांचे आर्थिक स्त्रोत वाढविण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने उचललेले हे महत्वाचे पाऊल आहे. विविध शासकीय सेवा पुरविता येणार असल्याबाबत सांगितले.

या कार्यशाळेस रायगड जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदार तालुका संघटनांचे अध्यक्ष, रास्त भाव धान्य दुकानदार, पेट्रोल पंप व डिझेल पंप धारक. एल.पी.जी. गॅस वितरक, खाद्यतेल व खाद्यतेलबियांचे व्यापारी, शिवभोजन केंद्र चालक/ मालक, ऑईल कंपन्यांचे जिल्हा संघटक व असिस्टंट मॅनेजर, तालुका पुरवठा शाखेतील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक