कॉपीमुक्त महाराष्ट्र अभियान “रायगड जिल्हा होणार कॉपीमुक्त”

 


 

अलिबाग,दि.14(जिमाका): उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2023, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता (12 वी) मंगळवार दि.21 फेब्रुवारी 2023 ते मंगळवार दि.21 मार्च 2023  तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता (10 वी)  गुरुवार दि.2 मार्च 2023 ते शनिवार दि. 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहेत.

यासाठी जिल्हानिहाय मुख्य परीक्षा केंद्र, परिरक्षण केंद्राची माहिती पुढीलप्रमाणे- परिरक्षण केंद्र संख्या 14+1=15(माथेरान), उच्च माध्यमिक परीक्षा केंद्र संख्या-46, माध्यमिक परीक्षा केंद्र संख्या-74 अशी आहे.

तसेच इयत्ता 12 वी च्या परीक्षेला बसणारे विद्यार्थी एकूण संख्या 31 हजार 272 तर  इयत्ता 10 वी चे परीक्षेला बसणारे विद्यार्थी एकूण संख्या-35 हजार 733 इतकी आहे.

उरण तालुक्यातील इयत्ता 12 वी प्रविष्ठ विद्यार्थी संख्या 2 हजार 101 तर इयत्ता 10 वी  प्रविष्ठ विद्यार्थी संख्या-2 हजार 430 आहे. पनवेल तालुक्यातील इयत्ता 12 वी प्रविष्ठ विद्यार्थी संख्या 10 हजार 454 तर इयत्ता 10 वी  प्रविष्ठ विद्यार्थी संख्या-12 हजार 411 आहे. खालापूर तालुक्यातील इयत्ता 12 वी प्रविष्ठ विद्यार्थी संख्या 2 हजार 452 तर इयत्ता 10 वी  प्रविष्ठ विद्यार्थी संख्या-2 हजार 914 आहे. कर्जत तालुक्यातील इयत्ता 12 वी प्रविष्ठ विद्यार्थी संख्या 2 हजार 564 तर इयत्ता 10 वी  प्रविष्ठ विद्यार्थी संख्या-2 हजार 980 आहे. सुधागड तालुक्यातील इयत्ता 12 वी प्रविष्ठ विद्यार्थी संख्या 657 तर इयत्ता 10 वी  प्रविष्ठ विद्यार्थी संख्या-750 आहे. पेण तालुक्यातील इयत्ता 12 वी प्रविष्ठ विद्यार्थी संख्या 1 हजार 855 तर इयत्ता 10 वी  प्रविष्ठ विद्यार्थी संख्या-2 हजार 87 आहे. अलिबाग तालुक्यातील इयत्ता 12 वी प्रविष्ठ विद्यार्थी संख्या 2 हजार 790 तर इयत्ता 10 वी  प्रविष्ठ विद्यार्थी संख्या-2 हजार 875 आहे. मुरुड-जंजिरा तालुक्यातील इयत्ता 12 वी प्रविष्ठ विद्यार्थी संख्या  534 तर इयत्ता 10 वी  प्रविष्ठ विद्यार्थी संख्या-638 आहे. रोहा तालुक्यातील इयत्ता 12 वी प्रविष्ठ विद्यार्थी संख्या 1 हजार 842 तर इयत्ता 10 वी  प्रविष्ठ विद्यार्थी संख्या-2 हजार 20 आहे. माणगाव तालुक्यातील इयत्ता 12 वी प्रविष्ठ विद्यार्थी संख्या 1 हजार 826 तर इयत्ता 10 वी  प्रविष्ठ विद्यार्थी संख्या-2 हजार 81 आहे. तळा तालुक्यातील इयत्ता 12 वी प्रविष्ठ विद्यार्थी संख्या 231 तर इयत्ता 10 वी  प्रविष्ठ विद्यार्थी संख्या-237 आहे. म्हसळा तालुक्यातील इयत्ता 12 वी प्रविष्ठ विद्यार्थी संख्या 624 तर इयत्ता 10 वी  प्रविष्ठ विद्यार्थी संख्या-610 आहे. श्रीवर्धन तालुक्यातील इयत्ता 12 वी प्रविष्ठ विद्यार्थी संख्या 843 तर इयत्ता 10 वी  प्रविष्ठ विद्यार्थी संख्या-937 आहे. महाड तालुक्यातील इयत्ता 12 वी प्रविष्ठ विद्यार्थी संख्या 2 हजार 166 तर इयत्ता 10 वी  प्रविष्ठ विद्यार्थी संख्या-2 हजार 285 आहे. पोलादपूर तालुक्यातील इयत्ता 12 वी प्रविष्ठ विद्यार्थी संख्या 333 तर इयत्ता 10 वी  प्रविष्ठ विद्यार्थी संख्या-478 आहे, असे एकूण इयत्ता 12 वी प्रविष्ठ विद्यार्थी संख्या 31 हजार 272 तर इयत्ता 10 वी  प्रविष्ठ विद्यार्थी संख्या-35 हजार 733 आहे.

 

 

            प्रत्येक तालुक्यासाठी तालुकास्तरावर एक पथक नियुक्त करण्यात आले आहे.  एकूण भरारी पथक संख्या 5 असून भरारी पथक क्र. 1 शिक्षणाधिकारी (माध्यमिक), भरारी पथक क्र.2 बैठे पथक शिक्षणाधिकारी (योजना), भरारी पथक क्र.3 शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भरारी पथक क्र. 4 (विशेष महिला भरारी पथक), भरारी पथक 5 उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक).

 संवेदनशील परीक्षा केंद्र संख्या-0, उच्च माध्यमिक-0,  माध्यमिक-0, असंवेदनशील परीक्षा केंद्र संख्या 120,उच्च माध्यमिक-4, माध्यमिक 74.

 जनजागृती मोहीम :-मुख्याध्यापक,शिक्षक,शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांची कार्यशाळा, दि.14 फेब्रुवारी 2023 दक्षिण रायगड येथील मुख्याध्यापक यांची कार्यशाळा दि.15 फेब्रुवारी 2023 उत्तर रायगड येथील मुख्याध्यापक यांची कार्यशाळा, जिल्हाधिकारी रायगड-अलिबाग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समिती गठित करण्यात आली आहे. थेट शाळा आणि पालकांशी संवाद साधणार आहेत.

पोलीस बंदोबस्त :- प्रत्येक परीक्षा केंद्राच्या 50 मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तीना प्रवेश नसेल, फौजदारी प्रक्रिया संहिता 1903 च्या कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांची झडती- 100 टक्के विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र प्रवेशावेळी शाळेतील कर्मचारीमार्फत झडती होणार,  प्रत्येक परीक्षा केंद्रावर मुलांच्या कॉपी तपासणीसाठी अंगणवाडी सेविका/मदतनीस साळेच्या महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर व्हिडीओ रेकॉर्डींग करण्याच्या केंद्रसंचालकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

 महसूल विभागाची बैठी पथके:- पूर्ण वेळ बैठे पथक स्थापन करण्यात येणार, परीक्षा केंद्रावर परीक्षेआधी 1 तास परीक्षेनंतर 1 तास (उत्तरपत्रिका ताब्यात घेईपर्यंत) बैठे पथक असेल, वरिष्ठ महसूल कर्मचारी यांची परीक्षा केंद्रावर नियुक्ती करण्यात येईल. मूळ गाव/ कामाचे ठिकाणी नियुक्ती करण्यात येणार नाही,

 जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी यांचे रायगड जिल्हा दौरे-  जिल्हास्तर व तालुकास्तर नियोजन

जिल्हास्तर- जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक),जिल्हा परिषद, रायगड-अलिबाग

तालुकास्तर- उपविभागीय अधिकारी, तहसिलदार (शहरी विभाग), गटविकास अधिकारी (ग्रामीण विभाग), गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख.

 विद्यार्थ्यांना कॉपी करण्याचा बेकायदेशीर मार्ग न वापरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोणी कॉपी करताना आढळल्यास त्या विद्यार्थ्यावर कठोर कारवाई केली जाईल. तोतया विद्यार्थी परीक्षेस बसविल्यास संपूर्ण परीक्षेची संपादणूक रद्द करुन पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध करण्यात येईल व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.  परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु असताना विषयाशी संबंधित अथवा अन्य कोणतेही हस्तलिखीत कागद, वह्या, टिपण्या, मार्गदर्शिका, पुस्तकातील पाने, पुस्तक, नकाशे इत्यादी जवळ बाळगणे, कपडयावर रायटिंग पॅडवर/हातावर  किंवा शरीराच्या भागावर लिहून ठेवणे, परीक्षांच्या टेबल खुर्ची, ड्युएल डेस्कमध्ये कॉपी संबंधित साहित्य आढळल्यास विद्यार्थ्याची संबंधित विषयाची संपादणूक रद्द करण्यात येईल. परीक्षार्थ्यांने परीक्षेपूर्वी अगर ऐनवेळी खोटे प्रतिज्ञापत्र हमीपत्र अपघाताचा/अपंगत्वाचा वैद्यकीय दाखला केंद्रसंचालकांकडे सादर करून सवलत घेतल्यास व केंद्र बदलून प्रविष्ट झाल्यास परीक्षेस बसण्यास प्रतिबंध करण्यात येईल, संपूर्ण परीक्षेची संपादणूक रद्द करण्यात येईल. संबंधित परीक्षार्थ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.

 मंडळाकडून परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी देण्यात आलेल्या प्रवेशपत्रावर व्दितीय प्रतीवर अनाधिकृतरित्या बदल केल्यास /बनावट प्रवेशपत्र तयार करून त्या आधारे परीक्षेस प्रविष्ठ झाल्यास परीक्षेस बसण्यास प्रतिबंध करण्यात येईल, संपूर्ण परीक्षेची संपादणूक रद्द करण्यात येईल. संबंधित परीक्षार्थ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. यानुसार सर्व पालकांनी कॉपीमुक्त अभियान याबाबतची नोंद घेऊन आपल्या मुलांना समुपदेशन करावे.  सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर परीक्षा होण्यापूर्वी एक तास आधी पोहोचणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, स्वावलंबन व अभ्यासू वृत्ती जागृत व्हावी, भविष्यात योग्य दिशेने स्वतःचा प्रवास करणे विद्यार्थ्याना हितकर व्हावे, योग्य सवयीचा अंगीकार योग्य टप्यावर होणे आवश्यक आहे. त्यानुसार आयोजित केलेल्या परीक्षेचे उद्दिष्ट सफल व्हावे, यासाठी प्रशासनाने सर्व जिल्हयातील सर्व यंत्रणा, पोलीस यंत्रणा, महसूल विभाग, जिल्हा परिषद यांनी एकत्र येऊन हे कॉपीमुक्त अभियान सफल करण्याचा संकल्प केला आहे. या अभियानामध्ये पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून पालकांना करण्यात आले आहे.

तसेच फेब्रुवारी-मार्च 2023 माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पालकमंत्री, सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक व संपूर्ण जिल्हा प्रशासनाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक