पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचा जिल्हादौरा कार्यक्रम



अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.13- राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रायगड जिल्हा रविंद्र चव्हाण हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
            शनिवार दि.14 रोजी सकाळी साडे आठ वा. डोंबिवली येथून शासकीय वाहनाने उरण जि.रायगडकडे प्रयाण.  सकाळी साडे दहा वा. उरण येथे आगमन व सीएनजी स्टेशनचे उद्घाटन. स्थळ : द्रोणगीरी उरण.  दुपारी बारा वा. उरण येथून केळवणे ता.पनवेलकडे प्रयाण.  दुपारी साडे बारा वा. केळवणे येथे आगमन व अन्न सुरक्षा योजने अंतर्गत शिधापत्रिका वितरणाचा कार्यक्रम. स्थळ : केळवणे ता.पनवेल.  दुपारी एक वा. केळवणे येथून पनवेलकडे प्रयाण. दुपारी अडीच वा. जेएसडल्ब्यू कंपनी वडखळ कंपनीमधील नोकरी भरतीबाबत बैठक.   स्थळ : चांगू कान्हा ठाकूर महाविद्यालय, सेक्टर-11 प्लॉट न.1 खांदा कॉलनी पनवेल. दुपारी  तीन वा. सुदर्शन कंपनी येथे स्थानिकांना रोजगार/कंत्राट मिळणेबाबत बैठक.  स्थळ : चांगू कान्हा ठाकूर महाविद्यालय, सेक्टर-11 प्लॉट न.1 खांदा कॉलनी पनवेल.  दुपारी साडे तीन वा. पंचामृत डेअरी तळोजा या कंपनीत स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करुन देणेबाबत बैठक. स्थळ : चांगू कान्हा ठाकूर महाविद्यालय, सेक्टर-11 प्लॉट न.1 खांदा कॉलनी पनवेल. चार वा. पनवेल येथून पलावा डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक