जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 37.47 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड (जिमाका)दि.13- जिल्ह्यात
गेल्या 24 तासात सरासरी 37.47 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1
जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1788.89
मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून
प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 16.00 मि.मि., पेण-16.00 मि.मि., मुरुड-7.00
मि.मि., पनवेल-12.60 मि.मि., उरण-2.00 मि.मि., कर्जत-56.20 मि.मि., खालापूर-43.00
मि.मि., माणगांव-46.00 मि.मि., रोहा-33.00 मि.मि., सुधागड-14.00 मि.मि., तळा-53.00
मि.मि., महाड-112.00 मि.मि., पोलादपूर-64.00 म्हसळा-64.00 मि.मि., श्रीवर्धन-13.00
मि.मि., माथेरान-47.70 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 599.50 मि.मि.इतके आहे.
त्याची सरासरी 37.47 मि.मि. इतकी आहे.
एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 56.92 टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment